Sugarcane cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cultivation : आडसाली उसाच्या क्षेत्रात ५० टक्क्यांनी घटीची शक्यता

Sugarcane Season : जिल्ह्यात यंदा उन्हाळ्यात पावसाची दडी, पाण्याची टंचाई आणि मॉन्‍सूनचा अपुरा पावसाचा फटका आडसाली हंगामातील ऊस लागवडीला बसला आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात यंदा उन्हाळ्यात पावसाची दडी, पाण्याची टंचाई आणि मॉन्‍सूनचा अपुरा पावसाचा फटका आडसाली हंगामातील ऊस लागवडीला बसला आहे. जिल्ह्यात यंदा आडसाली हंगामात २४ हजार ५९० हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. यावर्षी गाळपास जाणाऱ्या उसाच्या तुलनेत आडसाली ऊस लागवडीत तब्बल ५० टक्क्यांनी घटण्याची शक्यता असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात यंदाच्या गाळपास आडसाली हंगामातील ४५ हजार २६१ हेक्टरवरील ऊस उपलब्ध होणार आहे. वास्तविक पाहता, यंदा उन्हाळी पाऊस झालाच नाही. त्यातच एप्रिल-मे महिन्यापासूनच पाण्याची टंचाई निर्माण झाली.

मॉन्सूनचा पाऊस वेळेत सुरू झाला नाही. यामुळे आडसाली हंगामातील ऊस लागवड विलंबाने सुरू झाली. काही भागात उपलब्ध पाण्यावर ऊस लागवड केली. परंतु जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. याचा फटका आडसाली ऊस लागवडीला बसला आहे.

जिल्ह्यात आडसाली २४ हजार ५९०, तर पूर्व हंगामातील आणि पूर्व हंगाम ३ हजार ७७५ हेक्टर असे एकूण २८ हजार ३५६ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. यंदा आडसाली हंगामातील ऊस लागवड २४ हजार ५९० हेक्टरवर झाली आहे. यामध्ये वाळवा तालुक्यात सर्वाधिक ऊस लागवड झाली आहे. यंदा गाळपाला जाणाऱ्या उसाचे क्षेत्र ४५ हजार २६१ हेक्टर आहे.

आडसाली हंगामातील ऊस लागवडीचा कालावधी संपला आहे. अर्थात यंदाच्या आडसाली हंगामात उसाच्या क्षेत्रात २० हजार ६७१ हेक्टरने कमी झाले आहे. जिल्ह्यात सध्या पूर्व हंगामातील ऊस लागवड सुरू झाली आहे.

पूर्व हंगाम सप्टेंबरपासून सुरू होतो. परंतु सप्टेंबर महिन्यातही पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे पूर्व हंगामातील ऊस लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे आले नसल्याचे चित्र आहे. आत्तापर्यंत ३ हजार ७७५ हेक्टरवर पूर्व हंगामातील ऊस लागवड झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्व हंगामातील ऊस लागवड केली जाते.

पूर्व व सुरू हंगामातील क्षेत्र घटणार

वास्तविक पाहता, दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि खानापूर या तालुक्यांत पूर्व व सुरू हंगामातील ऊस लागवड करण्यासाठी शेतकरी प्राधान्य देतात. परंतु यंदा या भागात परतीचा पाऊसही झाला नाही.

भूजल पातळीही कमी झाली आहे. त्यामुळे ऊस पिकाला शाश्वत असे पाण्याची उपलब्धता होण्याची चिन्हे नाहीत. परिणामी या भागात पूर्व व सुरू हंगामातील उसाचे क्षेत्र घटेल अशी शक्यता सध्यातरी कारखानदारांकडून व्यक्त केली जात आहे.

तालुकानिहाय ऊस लागवड क्षेत्र

तालुका आडसाली पूर्वहंगामी

मिरज ५०३८ ३६२५

जत ७५ ००

वाळवा ११०५६ ००

तासगाव २४२७ ००

शिराळा ७६० ०००

आटपाडी १५१ ००

कवठेमहांकाळ १४७ ००

पलूस ४४८० १५०

कडेगाव ४५६ ०००

एकूण २४५९० ३७७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT