Horticulture Agrowon
ॲग्रो विशेष

Orchard Cultivation : जलकुंड आधारित फळबाग लागवड वरदान

Horticulture : जलकुंड आधारित फळबाग लागवड कोकणासाठी उपयुक्त असल्याचे मत विभागीय आयुक्त कार्यालयातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Poladpur News : जलकुंड आधारित फळबाग लागवड कोकणासाठी उपयुक्त असल्याचे मत विभागीय आयुक्त कार्यालयातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी व्यक्त केले.

कोकण भवन यांच्या विभागस्तरीय तपासणी दौऱ्यात गोळेगणी येथील आंबा फळबाग लागवडीस अनिल पाटील यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना सूचना केल्या.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान पोलादपूर तालुक्यातील कृषी विभागातील कामाची तपासणी करण्याकरिता कोकण भवन येथील उपायुक्‍त अनिल पवार यांनी देवपूर, तुर्भे, चांभारगणी, गोविले, गोळेगणी इत्यादी गावांना भेटी दिल्या. या वेळी फळबाग लागवडीची पाहणी करण्यात आली.

गोळेगणी येथील अनुसया गोपाळ येरुणकर, देवपूर येथील रामचंद्र दगडू पवार यांच्‍या आंबा बागेला भेट दिली. या वेळी तपासणी अधिकारी पाटील यांनी जलकुंडाची व फळबागेची पाहणी करून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत उपयुक्‍त अशी माहिती शेतकरीवर्गाला दिली.

तसेच जलकुंडामुळे फळबाग जिवंत राहण्याच्‍या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. पोलादपूरसारख्या दुर्गम भागात उताऱ्यावर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली व रोजगार हमी योजनेची योग्य सांगड घालत गोळेगणी परिसरामध्ये बागा उभ्या राहत आहेत.

त्यामुळे लहान शेतकऱ्यांना शाश्वत शेतीबरोबर स्थलांतर रोखण्यास मदत होत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहयो अनिल पाटील, जयेंद्र धानिवले, श्रीरंग मोरे, मनोज जाधव आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT