Pomegranate Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Theft : पोलिस पाटलांच्याच बागेतून डाळिंबांची चोरी

Fruit Theft Update : गुंजाळनगर (ता. देवळा) येथील पोलिस पाटील व प्रगतिशील शेतकरी योगेश गुंजाळ यांच्या डाळिंब बागेतून रविवारी (ता. २७) रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी डाळिंब फळांची चोरी केली.

Team Agrowon

Nashik News : गुंजाळनगर (ता. देवळा) येथील पोलिस पाटील व प्रगतिशील शेतकरी योगेश गुंजाळ यांच्या डाळिंब बागेतून रविवारी (ता. २७) रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी डाळिंब फळांची चोरी केली असून याप्रकरणी देवळा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शेतकरी योगेश गुंजाळ यांनी आपल्या साडेतीन एकर क्षेत्रात डाळींबाची तेराशे झाडांची लागवड केली असून झाडांना चांगला बहर आला आहे. फळबागेत गुंजाळ यांनी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले आहेत.

रविवारी (ता. २७) रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी या बागेतून जवळपास शंभर झाडांवरील डाळिंब चोरून नेल्याची घटना घडली. यामुळे गुंजाळ यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. डाळिंब चोरी करत असताना बागेत बसवलेला कॅमेरा सायरन वाजल्याने गोणीत भरून तोडून ठेवलेला काही माल बागेत टाकून चोरटे पळून गेले.

डाबाच्या वाढत्या चोऱ्यांना कंटाळून शेतकऱ्यांकडून लोखंडी व लाकडी माळे करून राखण केली जात आहे. डाळिंबाला १२० ते १५० रुपये प्रतिकिलो भाव आहे. काही शेतकऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. चोरीच्या घटनेने शेतकरी भयभीत झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity: नाशिक जिल्ह्यात १०८४ गावांमध्ये संभाव्य टंचाई

Local Body Elections: रत्नागिरी,सिंधुदुर्गात उमेदवारांपेक्षा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Leopard Sightings: बिबट्याच्या त्रासाने शेतकरी हैराण

Local Body Elections: कोल्हापुरात वैयक्तिक गाठीभेटींना प्राधान्य

Agriculture Festival: ‘कृषिपर्व’ महोत्सवात एआय वर विशेष मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT