Pomegranates Rate agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Rate : मार्डीच्या डाळिंबाला किलोला २४० रुपये भाव

Pomegranate Market : मार्डी येथील शेतकरी दादा पोळ व रूपाली पोळ यांच्या डाळिंब बागेला भागवत पवार यांनी भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते.

Team Agrowon

Satara News : मार्डी (ता. माण) येथील डाळिंबाला किलोचा दर २४० रुपये मिळाला आहे. गाव दुष्काळी असूनही डाळिंब शेतीतून लाखो रुपये उत्पन्न घेणाऱ्या शिक्षिका रूपाली पोळ यांचा आदर्श अन्य महिलांनी घ्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य डाळिंब संघाचे संचालक भागवत पवार यांनी केले.

मार्डी येथील शेतकरी दादा पोळ व रूपाली पोळ यांच्या डाळिंब बागेला भागवत पवार यांनी भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते. या बागेतील डाळिंब नुकतीच विक्रीसाठी दिली असून, किलोचा भाव २४० रुपये मिळाला आहे.

मार्डी हे गावात हजारो एकर डाळिंब लागवड झाली असून, कमी पाण्यात मोठे उत्पन्न शेतकरी घेत आहेत. हे कौतुकास्पद आहे. दरम्यान, दादा पोळ व त्यांच्या पत्नी रूपाली यांची डाळिंबाची बाग असून, त्यांनी प्रत्येक वर्षी ४०० झाडांतून किमान १३ ते १५ टन उत्पन्न घेतले आहे.

रूपाली पोळ या माध्यमिक शिक्षिका आहेत. त्या स्वतः या डाळिंब बागेचे व्यवस्थापन पाहतात, तर डाळिंब बहर धरत असताना झाडांना देण्यात येणारी खते, औषध, पाणी ते डाळिंब संगोपन करण्याची सर्व जबाबदारी त्या स्वतः करतात.

डाळिंब बागेवर औषध फवारणीसह अनेक कामे त्या शनिवार रविवार व सुट्टीच्या दिवशी स्वतः करतात. पती दादा पोळ यांची त्यांना साथ आहेच. मात्र रूपाली पोळ यांना मूळ शेतीची आवड असून, त्यांनी दुष्काळी भागात शेती एक आव्हान समजून काम करतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT