Pomegranate Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Center : डाळिंब केंद्राकडून उपेक्षित, गरजू शेतकऱ्यांना मदत

Pomegranate Farmer : राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्यावतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी फवारणी पंप आणि ताडपत्री या शेती उपयोगी साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

Team Agrowon

Solapur News : समाजातील उपेक्षित आणि गरजू शेतकऱ्यांना मदत देण्याचे आमचे धोरण आहे. त्या उद्देशानेच आम्ही मदत करत आहोत, यापुढेही अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत उपक्रमाचा लाभ देऊ, असे केगाव येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे यांनी कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथे व्यक्त केले.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्यावतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी फवारणी पंप आणि ताडपत्री या शेती उपयोगी साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विश्वकर्मा सोशल फाउंडेशनच्या साह्याने हा उपक्रम घेण्यात आला.

डाळिंब संशोधन केंद्राचे केंद्र संचालक डॉ. राजीव मराठे, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संग्राम धुमाळ, शास्त्रज्ञ नम्रता गिरी, महादेव गोगाव, विश्वकर्मा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक सुतार, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी दडे, योगेश गवळी, सरपंच मनोहर क्षीरसागर, उपसरपंच रमेश सुतार, सुहास भोसले, शरीफ सय्यद, बाळासाहेब माने, अनिल सुतार, अमोल सुतार, विश्‍वनाथ जगताप, अतुल रोकडे, दिलीप कांबळे उपस्थित होते.

श्री. मराठे म्हणाले, की केंद्र शासनाकडून शेतकरी केंद्रबिंदू ठरवून अनेक योजना राबवल्या जातात. त्याच योजनेचा भाग म्हणून शेतकऱ्यांना निविष्ठा आणि कृषी अवजारे देण्याचा हा उपक्रम आहे, अशा उपक्रमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा, त्यांना आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, केवळ निविष्ठाच नव्हे, तर यापुढे विविध पिकांविषयीचे प्रशिक्षण आणि कृषीसहलीतूनही शेतकऱ्यांचा आत्मविश्‍वास आपण वाढवू, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक विश्‍वकर्मा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक सुतार यांनी केले. त्यात त्यांनी फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संभाजी दडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास भोसले यांनी केले.

उत्तर सोलापुरातील १४ गावांतील १०० शेतकऱ्यांना साहित्यवाटप

या कार्यक्रमात कारंबा, कळमण, अकोलेकाटी, गुळवंची, बीबीदारफळ, मार्डी, नान्नज, साखरेवाडी, कुरुल, उच्चेठाण, शावळ, शेळगाव, काटी आदी १४ गावातील अनुसूचित जाती प्रवर्गातील १०० शेतकऱ्यांना प्रत्येकी एक फवारणीपंप आणि ताडपत्री हे साहित्य मोफत वाटप करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT