Kolhapur Apmc Election Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur APMC Election Update : कोल्हापूर जिल्ह्यात बाजार समिती निवडणुकीसाठी ६० केंद्रांवर मतदान

Bajar Samiti Election : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान सहा तालुक्यांतील ६०३ गावांतील ६० केंद्रांवर होणार आहे.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान (Kolhapur Agriculture Produce Market Committee) सहा तालुक्यांतील ६०३ गावांतील ६० केंद्रांवर होणार आहे. या केंद्रांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे यांनी जाहीर केली. दरम्यान, या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान होत असून, मतमोजणी रविवारी (ता. ३०) रमणमळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात होणार आहे.

बाजार समितीच्या १८ जागांसाठी ही निवडणूक होत असून, ५१ उमेदवार रिंगणात आहेत. निवडून द्यायच्या जागेत विकास संस्था गटातील ११ जागा आहेत. त्यात सर्वसाधरण गटाच्या सात, महिला प्रतिनिधी दोन, तर इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त गटातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.

ग्रामपंचायत गटातून चार जागा निवडून द्यायच्या असून, त्यात सर्वसाधारण गटाच्या दोन, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनुसूचित जाती गटातील प्रत्येकी एक, आडते-व्यापारी गटातील दोन, तर हमाल तोलाई गटातील एका जागेचा समावेश आहे.

या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीसह जनसुराज्य, शिंदे व ठाकरे गट एकत्र असून, या गटाला कपबशी तर भाजप, माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर गटाला रोडरोलर चिन्ह मिळाले आहे.

मतदान प्रक्रियेसाठी ४७० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय तालुका निबंधक दर्जाच्या आठ अधिकाऱ्यांची क्षेत्रीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT