PM Kisan Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan :धाराशिवमध्ये पीएम शेतकरी सन्मान योजनेत ३,७२६ लाभार्थ्यांची भर

Kisan Sanman NIdhi : या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख ३७ हजार ५२१ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाले आहेत.

Team Agrowon

Dharashiv News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता सोमवारी (ता. २४) वितरित केला आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख ३७ हजार ५२१ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाले आहेत. अठराव्या हप्त्याच्या तुलनेत यावेळी लाभार्थींच्या संख्येत सुमारे तीन हजार ७२६ ने वाढ झाली आहे.

शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्यात १८ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. त्यानंतर १९ व्या हप्त्याची रक्कम कधी जमा होते, याची उत्सुकता लाभार्थींमध्ये होती. जिल्ह्यातील दोन लाख ३३ हजार ७९५ शेतकऱ्यांना योजनेच्या अठराव्या हप्त्याचा लाभ झाला होता.

मागील हप्त्याच्या तुलनेत आता देण्यात आलेल्या १९ व्या हप्त्यावेळी लाभार्थींच्या संख्येत सुमारे तीन हजार ७२६ ने वाढ झाली आहे. दरम्यान, केवायसीअभावी १४०९ लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत; तसेच आधार क्रमांक लिंक न केल्यामुळे १४७३ लाभार्थींच्या खात्यावर रक्कम जमा होऊ शकलेली नाही.

याशिवाय जमीन नोंदणी (लॅण्ड सीडिंग) न केलेले ७२८ शेतकरी योजनेच्या लाभास मुकले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची सुरवात २०१९ मध्ये झाली. या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी लाभार्थींच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जातो. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १८ हप्ते मिळाले आहेत.

थोडक्यात महत्त्वाचे...

जिल्ह्यातील दोन लाख ३७ हजार ५२१ शेतकऱ्यांच्या खात्यावर शेतकरी सन्मानचा १९ वा हप्ता जमा.

ऑक्टोबरमधील १८ वा हप्ता दोन लाख ३३ हजार ७९५ चा शेतकऱ्यांना लाभ.

मागील हप्त्याच्या तुलनेत यावेळच्या लाभार्थी संख्येत तीन हजार ७२६ ने वाढ.

केवायसी न केलेले लाभार्थी १४०९.

आधार क्रमांक लिंक न केलेले लाभार्थी १४७३.

जमीन नोंदणी (लॅण्ड सीडिंग) न केलेले लाभार्थी ७२८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

SCROLL FOR NEXT