PM Kisan Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan : पी.एम. किसानचा १९ वा हप्ता लवकरच, ई- केवायसीसाठी कृषी विभागाकडून मोहीम

PM Kisan Scheme : केंद्रसरकारकडून पी. एम. किसान योजनेचा १९ वा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्याची शक्यता आहे.

sandeep Shirguppe

PM Kisan e-KYC : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. परंतु, पीएम किसानच्या हप्त्यापासून कागदपत्रांची पूर्तता नसलेले जिल्ह्यातील २० हजार ७९८ लाभार्थी वंचित आहेत. या लाभार्थ्यांसाठी गाव पातळीवर विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. त्यात कागदपत्रांची पूर्तता करा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी शुक्रवार (ता.१३) केले.

कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, केंद्रसरकारकडून पी. एम. किसान योजनेचा १९ वा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्याची शक्यता आहे. योजनेच्या साध्यतेसाठी ६ डिसेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ कालावधीत मोहीम राबवून ई-केवायसी प्रमाणीकरण, स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी सुरू आहे.

मोहिमेदरम्यान ई-केवायसी प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी नजीकचे सामाईक सुविधा केंद्रामधून अंगठा स्कॅन करावा. तसेच ग्रामस्तरीय नोडल अधिकारी यांच्यामार्फत (चेहरा स्कॅन करून) ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करावे. ई-केवायसी प्रमाणीकरणासाठी मोबाईलवरील पी. एम. किसान फेस ऑथेंटिकेशन अॅप आणि सामाईक सुविधा केंद्र या सुविधांपैकी कोणणीही एक सुविधा वापरावी असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

ई-केवायसी प्रमाणीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे, भूमिअभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबींच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर असणे आवश्यक आहे. बँक खाती आधार संलग्न करणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आधार अपडेट करून बँक शाखेशी संपर्क करून खाते डीबीटी एनबल्ड करून घ्यावे.

अथवा सोयीनुसार प्राधान्याने नजीकच्या पोस्ट कार्यालयात इंडियन पोस्ट पेमेंट बँक आधार संलग्न खाते उघडावे. ज्या लाभार्थ्यांचे भूमी अभिलेख नोंदी लँड शेडिंग प्रलंबित आहेत अशा लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क करून नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT