Sugarcane Labor  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Labor : पावसाचे पाणी कोप्यांमध्ये शिरल्याने ऊस तोडणी कामगारांचे हाल

Nashik Rain News : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झाले आहे. गोदाकाठ भागातील ऊस तोड मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत.

Team Agrowon

Nashik News : मोडलेली पालं, उडून गेलंलं छत, अस्ताव्यस्त पडलेला संसार, जिकडे नजर टाकावी, तिकडे फक्त चिखल, चिखल आणि चिखलच... हो चिखलातच राहणे, खाणे, बसायला जागा नाही, खायला अन्न नाही, कपडे नाहीत, लहान मुलं चिखलात खेळताहेत,

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झाले आहे. गोदाकाठ भागातील ऊस तोड मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत. एकीकडे गळीत हंगाम सुरू आहे.

चिखलातच स्वयंपाक करतायेत, सारा संसाराचा चिखल झालाय, चांदोरी (ता. निफाड) येथे दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे ऊस तोडणी कामगारांचे प्रचंड हाल झाले आहेत.

तर दुसरीकडे बदलत्या हवामानामुळे ऊस तोड मजुरांना काम करावे लागत आहे. त्यांच्या कोप्यांमध्ये पाणी शिरले असून, जनावरांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पावसामुळे वातावरणात गारवा वाढल्याने आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे.

सर्वच रस्ते चिखलमय झाल्याने वाहतुकीसाठी अडचणी येत आहेत. जिथे माणसांना पायी चालणं अवघड असताना एवढा बोजा घेऊन बैलांना कसं चालता येणार, असा प्रश्‍न ऊस तोड मजुरांना पडला आहे. जेथे मजुरांच्या निवाऱ्यासाठी कोप्या घातल्या आहेत, तिथेच पाणी साचल्याने मुलाबाळांची दैना होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT