NCP Sharad Pawar Party  Agrowon
ॲग्रो विशेष

Agrarian Reforms : कृषी सुधारणांच्या अंमलबजावणीची शपथ

NCP Sharad Pawar Party Manifesto : शेतकऱ्यांची उत्पादकता, शाश्‍वतता आणि नफा सुधारण्यासाठी कृषी सुधारणांची अंमलबजावणी करू, असे आश्‍वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने जाहीरनाम्यात दिले.

Team Agrowon

Mumbai News : शेतकऱ्यांची उत्पादकता, शाश्‍वतता आणि नफा सुधारण्यासाठी कृषी सुधारणांची अंमलबजावणी करू, असे आश्‍वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने जाहीरनाम्यात दिले. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींसह किमान आधारभूत किमतीची हमीही जाहीरनाम्यात देण्यात आली आहे.

पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, वंदना चव्हाण, रोहिणी खडसे, मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत शपथनामा प्रकाशित करण्यात आला. या वेळी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत त्यांचे शेतीचे ज्ञान मर्यादित आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

मराठी भाषेला अभिजात दर्जा, नागरी भागाला अनुकूल ठरणारी जीएसटी फेररचना, संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि नैसर्गिक आपत्तीतील कांदा, कापूस, आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधारभूत व्यवस्था, कांदा दरात स्थिरता आणण्यासाठी आयात निर्यात धोरण, मुंबई-गोवा महामार्गाचे काम जलदगतीने सुरू करणार,

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाची वस्तुस्थिती दर्शविणारी श्‍वेतपत्रिका, स्थलांतरित मजूर-कामगारांच्या कल्याणासाठी आयोगाची स्थापना, महापालिका क्षेत्रात मेडिकल कॉलेज, सामान्यांसाठी आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी शहरांत मोहल्ला क्लिनिकची उभारणी आदी आश्‍वासने शपथनाम्यात देण्यात आली आहेत.

शेतीमालाला रास्त आणि किफायतशीर भाव मिळावा यासाठी प्रयत्न स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी, शेतकऱ्यांसाठी एक आयोग स्थापन करून त्याद्वारे कर्जमाफी, शेतीमालाचे आयात-निर्यात धोरण व कायदे, तसेच कृषी धोरणांसाठीच्या शिफारशी यातील समस्यांचे निराकरण करणार, कृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी उत्पादक संस्था, ऑनलाइन मार्केट, आठवडा बाजार सुरू करण्यात येतील, असे आश्‍वासन दिले आहे.

कृषी तंत्रज्ञान, ग्रीन हाउससाठी हवामान नियंत्रण प्रणाली, शाश्‍वत शेती पद्धतींना चालना देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांद्वारे आधुनिक शेती तंत्रज्ञानासाठी प्रशिक्षण आणि पीक पद्धती, आंतरपीक आणि कृषी वनीकरण, अपारंपरिक पिकांच्या लागवडीवर भर देण्याचे आश्वासन दिले आहे.

अमित शहांना शेतीतले कळत नाही : शरद पवार

अमरावती येथील सभेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, ‘‘मागील दहा वर्षांत शेती संबंधीचे प्रश्‍न वाढले आहेत. हा कालखंड अमित शाह यांच्या पक्षाकडे होता. या कालावधीत त्यांनी काय केले ते सांगावे. अमित शाह यांचे शेती संबंधीच ज्ञान मर्यादित, त्यावर जास्त काय बोलायचे, त्यांनी दहा वर्षांत काय केले ते सांगावे.

वीस वर्षे आधी काय झाले, चाळीस वर्षे आधी काय झाले हे विचारू नये,’’ असेही ते म्हणाले. जयंत पाटील म्हणाले,‘‘विदर्भात गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यावर अमित शाहंकडे काय उत्तर आहे, शरद पवार कृषिमंत्री असताना आत्महत्या पाहून मनमोहनसिंगांना विदर्भात आणून कर्जमाफी करायला सांगितली होती.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Purandar Drought Condition: पुरंदर तालुक्यात दुष्काळाचे संकट; २३ हजार ६८४ हेक्टर क्षेत्र बाधित

Kharif Crop Damage: मावळमध्ये खरीप पिकांचे मोठे नुकसान; भात, सोयाबीन, भुईमुगाला ७० ते ८० टक्के फटका

Agricultural Infrastructure: शेतीमाल मूल्यवर्धनासाठी अत्याधुनिक सुविधांवर भर; नवीन गोदामे, शीतगृहे आणि विकिरण केंद्रे उभारणार: पणनमंत्री जयकुमार रावल

Sugarcane Farm Fire: पेटत्या उसात शिरून २५ एकर ऊस वाचविला

Sugarcane Price Dispute: सांगली जिल्ह्यात रात्री ऊस वाहतूक रोखण्यास सुरुवात; ऊसदराचा तिढा कायम; शेतकरी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT