Horticulture  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Cultivation : कळंबा गटाअंतर्गत फळबाग लागवड सुरू

Orchard Cultivation : कळंबा शेती गटाअंतर्गत चाळीस गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पस्तीस हेक्टरमध्ये फळबाग व फूलपीक लागवड करण्यात येत आहे.

Team Agrowon

Kolhapur News : कळंबा शेती गटाअंतर्गत चाळीस गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पस्तीस हेक्टरमध्ये फळबाग व फूलपीक लागवड करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अनेक युवा शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच हापूस, केसरी आंबा, ड्रॅगन फ्रूट, पेरू, केळी व निशिगंध, मोगरा, गुलाबासह अन्य जातींच्या फुलांची लागवड करत आहेत.

दरम्यान, रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत बिघडला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत. म्हणून त्या शेतकऱ्यांनी विषमुक्त फळबाग शेती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

करवीर तालुक्याच्या दक्षिणेतील शेती गटाअंतर्गत कळंबा, कात्यायनी, हणबरवाडी, मोरेवाडी, पाचगाव, खेबवडे, म्हाळुंगे, चुये, कावणे, कंदलगाव, कणेरी, कणेरीवाडी, दिंडनेर्लीसह चाळीसगावमध्ये अनेक शेतकऱ्यांनी ऊस, सोयाबीन, भात, ज्वारी, भाजीपाला या पारंपरिक शेती पिकांबरोबर फळबाग व फूलबाग लागवड करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

फळांच्या रोप लागवडीपासून फळधारणेपर्यंत शासनाचे बागांना शंभर टक्के अनुदान असल्यामुळे युवा शेतकरी पुढे येत आहेत. त्यामध्ये कोकणपट्ट्यातील व फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगड, रत्नागिरी हापूस आंब्याप्रमाणे येथील अनेक गावांमध्ये हापूस आंब्याची लागवड केली आहे.

तसेच अतिउष्ण व दुष्काळी पट्ट्यात केली जाणारी व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मागणी असलेले ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. तसेच अनेक जातीचे पेरू, केळी, नारळ, निशिगंध, मोगरा, झेंडू, गुलाब या बागाही बहरू लागल्या आहेत.

शेतकऱ्यांची नवी पिढी नोकरी व्यवसाय व उद्योगाला जोड देत या फळबाग लागवडीकडे वळल्याचे दिसत आहे. एकंदर कळंबा परिसरातील चाळीस गावांमध्ये पीक पॅटर्न बदलू लागला आहे.

सेंद्रिय खते, ‘ठिबक’चा वापर

कळंबा पॉवर ग्रीड येथील अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचा वापर, ठिबक सिंचन, शेती तज्‍ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आमराई फुलवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT