Turmeric Management Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Management : नियोजनबद्ध हळद लागवडीवर भर

Cultivation of Turmeric : अर्धापूर तालुक्यातील उमरी शिवारात तुकाराम आवर्दे यांची नऊ एकर शेती. त्यात दीड एकरांत हळद तर सहा एकरांवर ऊस आणि दीड एकरामध्ये टरबूज लागवड आहे. २०१० पासून तुकाराम हळद लागवड करत आहेत.

Team Agrowon

शेतकरी ः तुकाराम केशव आवर्दे
गाव ः उमरी, ता. अर्धापूर, जि. नांदेड
एकूण क्षेत्र ः नऊ एकर
हळद लागवड ः दीड एकर

Turmeric Crop : अर्धापूर तालुक्यातील उमरी शिवारात तुकाराम आवर्दे यांची नऊ एकर शेती. त्यात दीड एकरांत हळद तर सहा एकरांवर ऊस आणि दीड एकरामध्ये टरबूज लागवड आहे. २०१० पासून तुकाराम हळद लागवड करत आहेत. तुकाराम यांचे वडील केशव आवर्दे हे पारंपरिक पद्धतीने हळद लागवड करत होते. त्यात तुकाराम यांनी बदल करत २०१३ पासून बेडवर हळद लागवड करण्यास सुरुवात केली.

लागवड नियोजन ः
- या वर्षी २५ ते २८ जून या दरम्यान दीड एकर क्षेत्रामध्ये हळद लागवडीचे नियोजन होते. त्यानुसार शेणखत टाकून रोटाव्हेटर फिरवून शेत तयार करून घेतले.
- लागवडीसाठी साडेचार फुटांचे बेड तयार केले.
- लागवडीसाठी हळदीच्या सेलम या वाणाची निवड केली आहे. लागवडीसाठी एकरी आठ क्विंटल बेणे लागले. दरवर्षीच्या नियोजनानुसार इतक्या बेण्यामधून एकरी एकरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळत असल्याचे तुकाराम आवर्दे सांगतात.


- लागवडीपूर्वी रासायनिक बेणे प्रक्रिया करून घेतली. जेणेकरून कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळला जाईल.
- साडेचार फुटांच्या बेडवर दोन ओळींत १५ इंच, तर दोन बेण्यांत ९ इंच अंतर राखत बेणे लागवड केली. साधारण २५ ते २८ जून दरम्यान सर्व क्षेत्रांवरील लागवड पूर्ण केली.
- लागवडीनंतर कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण केले. आवश्यकतेनुसार बुरशीनाशके आणि कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या आहेत.

खत व्यवस्थापन ः
- बेसल डोसमध्ये डीएपी १०० किलो आणि निंबोळी पेंड ८० किलो याप्रमाणे प्रति एकर मात्रा दिल्या आहेत.
- उगवणी झाल्यानंतर २० ते ३० दिवसांनी ह्युमिक ॲसिड व १९:१९:१९ यांची आळवणी केली.
- लागवडीनंतर ३० दिवसांनी १०:२६:२६ हे दोन पोते, पोटॅश एक पोते, युरिया २५ किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये ५० किलो याप्रमाणे मात्रा दिल्या.


- उगवणीनंतर ६० दिवसांनी फुटवे चांगले येण्यासाठी १२:३२:१६ एक पोते, पोटॅश एक पोते व सूक्ष्म अन्नद्रव्य ५० किलो याप्रमाणे पुन्हा मात्रा दिली.
- त्यानंतर १२:६१:० हे विद्राव्य खत २० किलो प्रति एकर प्रमाणे ठिबकद्वारे दिले.
- कंदाची योग्य वाढ होण्यासाठी ०:०:५० हे विद्राव्य खत ३० किलो, त्यानंतर आठ दिवसांनी जिब्रेलिक ॲसिड २५ ग्रॅम प्रमाणे देण्यात आले.

आगामी नियोजन
- सध्या लागवड होऊन ५ महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे.
- रासायनिक खतांच्या मात्रा ड्रीपद्वारे देण्याच्या कार्यवाहीत सातत्य राखले जाईल. पुढील आठवडाभरात ठिबकद्वारे १३:४०:१३ हे विद्राव्य खत २५ किलो प्रति एकर प्रमाणे दिले जाईल.
- डिसेंबर महिन्याच्या शेवटी १३:०:४५ हे विद्राव्य खत १० किलो प्रति एकर प्रमाणे ठिबकद्वारे देणार आहे.


- फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ०:०:५० या खताची मात्रा दिली जाईल. त्यानंतर पिकास पाणी देणे हळूहळू कमी केले जाईल.
- पिकाची पक्तवतेची अवस्था पाहून साधारण ३० मार्चच्या दरम्यान हळद काढणीस सुरुवात केली जाईल.

तुकाराम आवर्दे, ९६५७८७५०९३
(शब्दांकन : कृष्णा जोमेगावकर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT