Siddheshwar Sugar Mill Agrowon
ॲग्रो विशेष

Siddheshwar Sugar Mill : जुन्या चिमणीवर ऊस गाळपाचे नियोजन

Sugarcane Season : होटगी रोडवरील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची ९२ मीटर अनधिकृत चिमणी विमानतळास अडचणीची ठरत असल्याने महापालिकेच्यावतीने ती १५ जून रोजी जमीनदोस्त करण्यात आली.

Team Agrowon

Solapur : आगामी हंगामात शेतकऱ्यांकडील उसाचे गाळप करता यावे, या हेतूने श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याने महापालिकेकडे ३० मीटर चिमणी बांधणीसाठी परवानगी मागितली आहे.

दुसरीकडे ‘एनटीपीसी’च्या धर्तीवर विमानतळ विकास प्राधिकरणाकडे ६० मीटर चिमणी उभारणीलाही परवानगी मागितली. दोन्हीकडून परवाना मिळाला नसल्याने आता जुन्या चिमणीवरून गाळप करता येईल का, यादृष्टीने कारखान्याने प्रयत्न सुरू केले आहेत.

होटगी रोडवरील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची ९२ मीटर अनधिकृत चिमणी विमानतळास अडचणीची ठरत असल्याने महापालिकेच्या वतीने ती १५ जून रोजी जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी कारखान्याने त्याच जागेवर ३० मीटर चिमणी नव्याने बांधायला परवानगी मागितली. त्यासाठी महापालिकेने मागणी केलेला प्रत्येक कागद कारखान्याने सादर केला. चिमणी उभारणीला अद्याप परवानगी मिळालेली नाही.

दुसरीकडे विमानतळावरून नाईट लॅण्डिंग शक्य नसल्याने आम्ही विमानतळ विकास प्राधिकरणाकडे एनटीपीसीप्रमाणे ६० मीटर चिमणी उभारणीला परवानगी द्यावी, अशीही मागणी केल्याचे कारखान्याचे तज्ज्ञ मागदर्शक धर्मराज काडादी म्हणाले.

मात्र, कोणाकडूनही परवानगी न मिळाल्याने आता नवीन चिमणी बांधून गाळप घेणे अशक्य आहे. पूर्वीच्या जुन्या चिमणीवरून गाळप शक्य होईल का, किती टन गाळप दररोज होऊ शकते, याची चाचपणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचा कारखाना बंद राहू नये, यासाठी अतोनात प्रयत्न सुरु आहेत. विमानतळ विकास प्राधिकरण व महापालिका, यांच्याकडे नवीन चिमणी उभारणीसाठी परवानगी मागूनही अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे जुन्या चिमणीवर गाळप घेण्यासंदर्भातील नियोजन केले जात आहे.
- धर्मराज काडादी, तज्ज्ञ सल्लागार, श्री सिद्धेश्वर साखर कारखाना, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT