Water Management Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management : पाण्याचे सूक्ष्म नियोजन करा

Water Conservation : मराठवाड्यातील प्रकल्पातील पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिल्या.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर : विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त तथा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जायकवाडी प्रकल्प, नांदूर मधमेश्वर कालवा प्रकल्प, निम्न दुधना प्रकल्प, माजलगाव प्रकल्प, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प, पूर्णा प्रकल्प (येलदरी व सिद्धेश्वर प्रकल्प), मांजरा प्रकल्प, निम्न तेरणा प्रकल्प, सिना कोळेगाव प्रकल्प या नऊ मोठ्या प्रकल्पांवरील सिंचन तसेच पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची (शासकीय सदस्यांची) बैठक सोमवारी (ता. २५) झाली.

या वेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे सबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त तसेच सबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मुख्य अभियंता लाभक्षेत्र तथा सदस्य जयंत गवळी, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे (कडा) अधीक्षक अभियंता सं. को. सब्बीनवार, अधीक्षक अभियंता रूपाली ठोंबरे, पल्लवी जगताप, महसूल उपायुक्त नयना बोंदर्डे, जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव,

नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश गुजरे, जायकवाडी पाटबंधारे विभाग जालनाचे कार्यकारी अभियंता सुरेखा कोरके, लाभक्षेत्र पाटबंधारे विभाग क्र.-१ लातूरचे कार्यकारी अभियंता अमर पाटील, धाराशिव पाटबंधारे विभाग क्र-१ चे कार्यकारी अभियंता अ. ना. मदने उपस्थित होते.

श्री. गावडे म्हणाले, की पिण्यासाठी, शेतीसाठी तसेच उद्योगासाठी पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे. पाणीटंचाई भासणार नाही तसेच टँकरची गरज पडू नये त्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. या वेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सं. को. सब्बीनवार, अधीक्षक अभियंता रूपाली ठोंबरे, पल्लवी जगताप तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे नांदेडचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांनी प्रकल्पातील सद्यस्थिती व नियोजनाबाबत माहिती दिली.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सिंचन प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात आले. संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या यानंतर होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय करण्यात येणार असल्याचेही ठरले.

गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ, जलसंपदा विभाग छत्रपती संभाजीनगर, संबंधीत जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, प्रकल्पाशी संबंधित अधीक्षक अभियंता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्पाशी संबंधित कार्यकारी अभियंता, कृषी कार्यालयाचे जिल्हा कृषी अधीक्षक आणि महानगरपालिका व नगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT