Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Issue : धामणी नदीपात्रात पाण्यासाठी जेसीबीद्वारे पाडले खड्डे

Water Shortage : मातीच्या बंधाऱ्यातील पाणी संपल्याने धामणी नदी कोरडी पडली आहे. येथे शेतीचा पाणीप्रश्न गंभीर बनला असून शेतकऱ्यांनी पाण्यासाठी नदीत जेसीबीद्वारे खड्डे मारले आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : धामणी नदीवर ९ ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना समांतर शेतकऱ्यांनी स्वखर्चातून बांधलेल्या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे. राधानगरी व गगनबावडा तालुक्याच्या हद्दीवरील पखालीवाडी व कडवे दरम्यानच्या मातीच्या बंधाऱ्यातील पाणी संपल्याने धामणी नदी कोरडी पडली आहे. येथे शेतीचा पाणीप्रश्न गंभीर बनला असून शेतकऱ्यांनी पाण्यासाठी नदीत जेसीबीद्वारे खड्डे मारले आहेत.

उर्वरित बंधाऱ्यातील पाणी एप्रिलअखेर पुरेल अशी स्थिती आहे. त्यामुळे परिसरात पाणीटंचाई तीव्र बनणार आहे. धामणी नदीवरील राई कळकसांद्रे (ता. राधानगरी) येथील अनेक वर्षं रखडलेल्या मध्यम प्रकल्पाचे काम दोन वर्षांपासून वेगाने सुरू आहे. प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर राधानगरी, गगनबावडा व पन्हाळा या तीन तालुक्यांतील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून प्रकल्पाची कामे अपूर्ण आहेत.

परिणामी समांतर बंधारे हाच एकमेव पर्याय असल्याने धामणी नदीवर राई (ता. राधानगरी) ते पणोरे (ता. पन्हाळा) पर्यंत नऊ ठिकाणी समांतर बंधारे बांधलेले आहेत. यासाठी शेतकरी स्वखर्चाने व श्रमदानाने मातीचे बंधारे घालून पाणी अडवून ते काटेकोर नियोजन करतो.

अडीच लाख रुपये एका बंधाऱ्याला खर्च येत असून अडविलेले पाणी एप्रिलमध्येच संपून जाते. त्यामुळे एक महिना येथे टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. सध्या म्हासुर्ली बंधाऱ्यात महिनाभर पाणी पुरेल इतके पाणी असून गवशी बंधाऱ्यात १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी आम्हाला वनवास भोगावा लागत आहे. धामणी नदी कोरडी पडणे पाचवीलाच पुजले आहे. त्यामुळे नदीत खड्डे खोदून पिके वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
प्रभाकर कुपले, शेतकरी

पाणीप्रश्‍न बनला गंभीर

पखालीवाडी व कडवेदरम्यानच्या मातीच्या बंधाऱ्यातील साठा पूर्णपणे संपला असून येथे धामणी नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे पाणी मिळविण्यासाठी शेतकरी नदीपात्रात जेसीबीद्वारे खड्डे खोदून पाणी मिळविण्यासाठी धडपडत करत आहेत. सध्या या परिसरात शेतीसह जनावरे व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, नळपाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पुढील महिन्यापासून तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT