Mulberry Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Mulberry Cultivation : रत्नागिरीत तुती लागवडीचा पथदर्शी प्रकल्प

Tuti Lagvad : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) रेशीम उद्योग विकास योजनेतून रेशीम शेतीला चालना दिली जाणार आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) रेशीम उद्योग विकास योजनेतून रेशीम शेतीला चालना दिली जाणार आहे. या योजनेची रत्नागिरी जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेने पावले उचलली आहेत. प्रत्येक तालुक्यात १० एकरप्रमाणे ९० एकर क्षेत्रावर तुती लागवडीचा पथदर्शी प्रकल्प केला जाणार आहे. त्यासाठी पावणेचार कोटींचा आराखडा करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

रेशीम संचालनालयासह कृषी विभाग आणि पंचायत समिती यांच्यामार्फत रेशीम उद्योग योजना राज्यभरात प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे. कमी खर्चात जादा उत्पन्न मिळवून देणाऱ्या तुती लागवड आणि रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने पुढील पाच वर्षांसाठी राज्यात सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्राचे उद्दीष्ट ठेवले आहे.

त्यासाठी मनरेगातून शेतकऱ्यांना एकरी २ लाख १८ हजार व संगोपन वा शेडसाठी १ लाख ७९ हजार असे मिळून ३ लाख ९७ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेच्या पात्रतेसाठी शेतकऱ्याकडे कमीतकमी एक एकर तर, जास्तीत जास्त ५ एकर क्षेत्र अपेक्षित आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना नऊ तालुक्यांत राबवली जाणार आहे.

त्यासाठी कृषी विभाग, पंचायत समितीतर्फे प्रत्येक तालुक्यात कार्यशाळा सुरू झाल्या आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी १० एकर क्षेत्राचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. नऊ तालुक्यांतून सुमारे ९० एकर क्षेत्रावर तुती लागवड होणार आहे. सुमारे पावणेचार कोटींचा आराखडा ‘मनरेगा’मधून तयार केला जाणार आहे.

राजापूर तालुक्यात तुती लागवडीच प्रयोग यशस्वी झाला आहे. येथील माजी सैनिक वासुदेव घाग, राजाराम पाटेकर, सुधीर पालकर, हनुमंत विचारे आणि अमर खामकर या शेतकऱ्यांनी तुतीची लागवड केली. त्यांनी सुमारे दोनशेहून अधिक अंडीपुंज आणि दीडशेहून अधिक कोषनिर्मिती केली. त्यामध्ये गोठणेदोनिवडे येथील युवा शेतकरी हनुमंत विचारे यांनी तब्बल २० अंडी पुंज मागे ४८० काऊंट असलेल्या ए ग्रेडची २२ किलो कोषनिर्मिती केली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तुती लागवडीचे नियोजन झाले आहे. प्रत्येक तालुक्याला दहा एकरचे उद्दीष्ट ठेवले आहे. आतापर्यंतच्या बैठकांमध्ये शेतकरी सकारात्मक आहेत. यामधून कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन निर्माण होणार आहे.
- अजय शेंडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT