Cashew Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Crop : काजू बी काळवंडली; कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत

Cashew Disease : जिल्ह्याच्या काही भागांतील काजू बी काळवंडली आहे. ढगाळ वातावरण आणि धुके यामुळे विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव काजू पिकावर झाला आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्याच्या काही भागांतील काजू बी काळवंडली आहे. ढगाळ वातावरण आणि धुके यामुळे विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव काजू पिकावर झाला आहे. दोन फवारण्या घेतलेल्या बागांमध्ये देखील कीड-रोग दिसून येत असल्यामुळे काजू उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जिल्ह्यात यावर्षी काजू हंगाम लांबणार आहे. मात्र चांगल्या थंडीमुळे यावर्षी काजूला चांगली पालवी आणि मोहरदेखील आला. त्यामुळे मोठ्या उत्पादनाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. परंतु डिसेंबरमध्ये जिल्ह्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले.

त्यानंतर आठ ते दहा दिवस ढगाळ वातावरण राहिले. याशिवाय जिल्ह्याच्या अनेक भागांत दाट धुके देखील होते. त्याचा परिणाम आता काजू बीवर दिसून येत आहे. काही भागांतील कोवळी काजू बी काळवंडत आहे.

याशिवाय पालवी आणि मोहरावर बुरशीचा प्रादुर्भाव देखील दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी दोन दोन फवारण्या घेतल्या त्या शेतकऱ्यांच्या बागांमध्ये हा परिणाम दिसून येत आहे.

त्यामुळे काजू उत्पादकांमध्ये काहीशी अस्वस्थता आहे. कोरोनानतंरचा काळ काजू उत्पादकांसाठी चांगला राहिलेला नाही. काजू उत्पादन, काजुला मिळणारा दर यामुळे बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

Maharashtra Drought Crisis: होरपळीच्या सुलतानी झळा

Onion Procurement Irregularities: ‘खरे’ उत्तर मिळेल?

Water Shortage Management: पुणे जिल्ह्यात टंचाईमुळे पाणी नियोजनाला वेग

SCROLL FOR NEXT