Electricity Bills agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Bills : १५ दिवसांत वीज बिले भरा अन्यथा विद्यूत प्रवाह खंडीत, महावितरणचा शेतकऱ्यांवर दबाव

Mahavitran Company : महावितरण कंपनीने ऐन उन्हाळ्यात वीज खंडीत करण्याच्या नोटिसा दिल्याने शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

sandeep Shirguppe

Electricity Bill of Agriculture Pump : महावितरणकडून कृषी पंपाची वीज बिले भरण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे. १५ दिवसांत वीज बिले भरा अन्यथा विद्यूत प्रवाह खंडीत करण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात येत आहे. दरम्यान अनेक तालुक्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे अशातच पाटबंधारे विभागाकडून उपसाबंदी लागू करण्यात ये आहे. तर दुसरीकडे महावितरण कंपनीने ऐन उन्हाळ्यात वीज खंडीत करण्याच्या नोटिसा दिल्याने शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

कृषी पंपासाठी २४ तासांत फक्त ८ तास विजपुरवठा केला जातो परंतु यंदा पाऊस कमी असल्याने पाण्याची गरज भासत आहे. परिणामी, विजेच्या वाढत्या मागणीमुळे भारनियमन वाढीचाही फटका बसत आहे. त्यामुळे फ्यूज जाणे, ट्रान्सफॉर्मर जळणे, तारा तुटणे आदी प्रकाराने वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या वारंवार घटना घडत असतात. त्यामुळे दिवसातून ५ ते ६ तासचं वीज पुरवठा होत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पिके करपून जात असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

पाण्याचा क्रम लावण्यासाठी शेतकऱ्यांचा कस लागत आहे. महावितरणकडून वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने दिला जात असल्याचे सांगत वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे ससेमिरा लावला जात आहे. महावितरण कंपनीने दोन वर्षांपूर्वी कृषी पंपांना वीज मीटर बसवले होते.

मात्र, वीज मीटरचे रीडिंग घेण्यासाठी ना कोणी आले, ना वीज बिले शेतकऱ्यांना देण्यात आली. आता, गेल्या आठवड्यापासून नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटिसा मिळाल्यापासून शेतकऱ्यांना १५ दिवसात वीज बिल भरले नाही, तर वीज पुरवठा खंडीत करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ येत आहे.

ट्रान्सफॉर्मरसाठी अडवणूक...

दरवर्षी उन्हाळ्यात ट्रान्सफॉर्मर जळाल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडतात. शेतकरी कार्यालयात गेल्यानंतर बिले भरा मग ट्रान्सफॉर्मरचे बघू, असे म्हणून अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते.

ट्रान्सफॉर्मरसाठी महावितरणच्या कार्यालयात शेतकरी हेलपाटे घालत असतात. आठ दिवसाने नवीन ट्रान्सफॉर्मर सुरू होतो. तो पर्यंत पिके वाळून जात असल्याचा प्रकार होत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT