Indian Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Bharat Krishak Samaj : शेतकऱ्यांना मासिक १० हजार मानधन द्या

देशातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. महागाई वाढू नये यासाठी शासनातर्फे वेगवेगळी धोरणे राबविली जातात.

Team Agrowon

Akola News : देशातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. महागाई वाढू नये यासाठी शासनातर्फे वेगवेगळी धोरणे राबविली जातात. परंतु त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतमालाला भाव न मिळाल्याने उत्पादन खर्चही निघत नाही.

अशा या अन्नदात्या शेतकऱ्याला मासिक १० हजार रुपये मानधन दिले जावे, अशी मागणी भारत कृषक समाजाने (Bharat Krishak Samaj) निवेदनाद्वारे केली आहे.

नवी दिल्ली येथे कृषक समाजाचे महाराष्ट्र चेअरमन डॉ. प्रकाश मानकर, डॉ. रमेश ठाकरे यांनी पंतप्रधान, कृषीमंत्री, अर्थमंत्री, वाणिज्यमंत्री तसेच नितीन गडकरी यांनाही निवेदन दिले.

तसेच, मासिक मानधनासह आयात निर्यात धोरण, हमीभाव, पीकविमा या महत्त्वाच्या विषयांवर निवेदन दिले.

उत्पादन तसेच बाजारभावाअभावी शेतकरी सतत कर्जबाजारी राहतो. नैसर्गिक आपत्तीमुळेही त्याचे नुकसान होते. तुटपुंज्या शासकीय मदतीमुळे त्याचे नुकसान भरून निघत नाही. स्वतःचा

घरखर्च, दवाखाना, मुलांचे शिक्षण हा खर्चही तो करू शकत नाही. याच विवंचनेत आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. म्हणून या अन्नदात्याला मासिक मानधन १० हजार रुपये सुरू करावे अशी मागणी करण्यात आली.

महाराष्ट्रात अंदाजे दोन कोटी शेतकरी कुटुंबाला मानधन देण्यासाठी वर्षाचे २४ हजार कोटी रुपये लागतील.

ते पैसे आमदार, खासदार, मोठे अधिकारी यांच्या पेन्शनमधून कमी करून सहज जमवता येतील, असेही सुचवले. अर्थ मंत्रालयातील अर्थसंकल्प संचालक सुनील चौधरी यांच्याशी चर्चा केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT