Sugarcane Crushing  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : उसाची पहिली उचल किमान तीन हजार रुपये द्या

Sugarcane Season 2024 : यंदाचा ऊस तोडणी हंगाम सुरू होऊन महिना झाला तरी अद्याप कोणत्याही कारखान्याने पहिली उचल दिली नाही.

Team Agrowon

Nanded News : नांदेड विभागातील साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल किमान तीन हजार रुपये द्यावी, अन्यथा साखर कारखान्यांच्या विरोधात सर्व शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन उभारण्याचा इशारा ऊस दरनियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेना प्रणीत शेतकरी सेनेचे कार्याध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी दिला आहे.

यंदाचा ऊस तोडणी हंगाम सुरू होऊन महिना झाला तरी अद्याप कोणत्याही कारखान्याने पहिली उचल दिली नाही. विभागात पहिली उचल किमान तीन हजार रुपये देण्याबाबत कारखान्यांना निर्देशित करावे असे निवेदन प्रल्हाद इंगोले यांनी राज्याचे साखर आयुक्त व नांदेड येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) सचिन रावल यांना दिले आहे.

केंद्राने २०२३ -२०२४ साठी १० टक्केच्या रिकव्हरीला प्रति टन तीन हजार चारशे रुपये दर जाहीर केला आहे. नांदेड विभागातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना, पूर्णा सहकारी साखर कारखान्यासह अन्य साखर कारखान्यांची अंतिम रिकव्हरी ही अकरा -बाराच्या दरम्यान आहे.

त्यामुळे पहिली उचल तीन हजार रुपये देणे सहज शक्य आहे. पश्चिम महाराष्ट्रात अनेक साखर कारखान्यांनी पहिली उचल साडेतीन हजार रुपये पर्यंत जाहीर केली आहे. नांदेड विभागातील साखर कारखाने मात्र उसाचा दर जाहीर न करता नियमांची पायमल्ली करत मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांना कमी दर देतात.

त्यामुळे सर्व साखर कारखान्यांनी पहिली उचल किमान तीन हजार रुपये देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व पक्षीय शेतकऱ्यांना, समविचारी शेतकरी संघटनांना सोबत घेऊन सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा इशारा प्रल्हाद इंगोले यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Talathi Recruitment 2026: तलाठी भरतीत कोतवालांना प्राधान्य, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत

Native Seed Conservation: देशी वाणांच्या थेट विक्रीतून उभारले अर्थकारण

El Nino Impact: जागतिक शेतीमाल बाजाराला दुहेरी झटका

Fertilizer Black Marketing : खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात १.६९ लाख धाडी; महाराष्ट्रात सर्वाधिक कारवाई, लोकसभेत सरकारची माहिती

Gen Z Student Protest: ‘जेन झी’ आंदोलनाच्या निमित्ताने...

SCROLL FOR NEXT