Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Rain : खानदेशात पाऊस सुरूच

Rainfall Update : खानदेशात जूनमध्ये सरासरीच्या तुलनेत अनेक भागांत चांगला किंवा अधिक पाऊस झाला. जूनमध्ये अपेक्षित पावसाच्या तुलनेत काही महसूल मंडळांत अधिकचा पाऊस झाला होता.

Team Agrowon

Jalgaon News : मागील चार ते पाच दिवसांपासून खानदेशात काही भागात रोज पाऊस येत आहे. काही भागात तुरळक पाऊस असून, काही भागात पावसाने विश्रांती घेतल्याची स्थिती आहे. खानदेशात जूनमध्ये सरासरीच्या तुलनेत अनेक भागांत चांगला किंवा अधिक पाऊस झाला. जूनमध्ये अपेक्षित पावसाच्या तुलनेत काही महसूल मंडळांत अधिकचा पाऊस झाला होता.

या महिन्यातही पाऊसमान आहे. पण जोरदार पाऊस नाही. सध्या जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, अमळनेर, चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा, नवापूर, अक्कलकुवा आदी भागात रोज पाऊस येत आहे.

पाऊस सर्वत्र एकसारखा नाही. काही भागात हलका तर काही भागात तुरळक पाऊस असते. नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात मागील सहा दिवसांपासून तुरळक पाऊस सुरूच आहे. शेतात वाफसा नसल्याने आंतरमशागत, तणनियंत्रण आदी कामांवर परिणाम झाला आहे. शेतकरी तणनाशकांची फवारणी घेत आहेत.

पावसाची टक्केवारी बरी

खानदेशात पावसाची टक्केवारी मात्र बरी आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण ६३२ मिलिमीटर पाऊस पडतो. यातील २८ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. धुळ्यात ५३५ मिलिमीटर एकूण पाऊसमान आहे. यातील ३२ टक्के पाऊस धुळ्यात झाला आहे. नंदुरबारात मागील आठवड्यात एकूण सरासरीच्या तुलनेत पावसाची तूट आहे. तेथे सुमारे २० टक्के पावसाची तूट आहे.

काही भागात अत्यल्प, उष्णता घटली

जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, बोदवड आदी भागात मागील काही दिवसांपासून अपवाद वगळता पाऊस झालेला नाही. धुळ्यातील धुळे, शिंदखेडा भागातही पावसाने विश्रांती घेतल्याची स्थिती आहे. मागील आठवड्यातही धुळ्यातील धुळे, साक्री भागात मध्यम ते जोरदार पाऊस होता. जेथे पाऊसमान कमी आहे.

तेथे शेतीची मशागत व अन्य कामे सुरू आहेत. फवारणी, खते दिली जात आहेत. तसेच तणनियंत्रणही केले जात आहे. पीकस्थिती बरी आहे. पावसाचा ताण खानदेशात पिकांना या पावसाळ्यात आतापर्यंत पडलेला नाही, अशी स्थिती आहे. काऱण उष्णता कमी झाली आहे. ऊन सावली अशी स्थिती असते. मध्येच तुरळक पाऊसही येतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT