Pasha Patel  Agrowon
ॲग्रो विशेष

Pasha Patel Honored : बांबू क्षेत्रातील योगदानाबद्दल पाशा पटेल यांचा सत्कार

Bamboo Industry Success : ‘नेट झीरो साध्य करण्यासाठी न्याय्य संक्रमण-सार्क क्षेत्रामध्ये बांबूची भूमिका’ या विषयावर देव्हेंचर सारोवर पोर्टिको, नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

Team Agrowon

New Delhi News : ‘नेट झीरो साध्य करण्यासाठी न्याय्य संक्रमण-सार्क क्षेत्रामध्ये बांबूची भूमिका’ या विषयावर देव्हेंचर सारोवर पोर्टिको, नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. फाउंडेशन फॉर एमएसएमई क्लस्टर्स (एफएमसी) तसेच सार्क डेव्हलपमेंट फंड (एसडीएफ) यांच्या सहकार्याने या परिषदेत बांबूच्या साह्याने शाश्‍वत विकास व नेट झीरो भविष्यात कसे योगदान देता येईल यावर चर्चा करण्यात आली.

या परिषदेत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना भारतातील बांबू क्षेत्राच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. त्यांचा सन्मान फाउंडेशन फॉर एमएसएमई क्लस्टर्सचे अध्यक्ष अजय शंकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सोशल विंडो, सार्क डेव्हलपमेंट फंडाच्या सहाय्यक संचालक रिन्झी पेम, आणि एफएमसीचे कार्यकारी अध्यक्ष मुकेश गुलाटी उपस्थित होते.

ही परिषद ‘सार्क देशांमध्ये एकात्मिक बांबू-आधारित उद्योजकता विकासाला चालना देणे’ या प्रकल्पाचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरली. हा प्रकल्प २०१७ पासून अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत आणि नेपाळ येथे राबवला जात आहे. सार्क डेव्हलपमेंट फंडच्या सहकार्याने हा प्रकल्प शाश्‍वत आर्थिक प्रगती आणि पर्यावरण संरक्षण यासाठी बांबूचा उपयोग करण्यावर भर देण्यात येत आहे.

या परिषदेमुळे सार्क देशांनी सामाजिक व आर्थिक विकासासाठी बांबू क्षेत्राचा विकास करण्याची सामूहिक वचनबद्धता पुन्हा अधोरेखित झाली. हवामान बदलावर मात करण्यासाठी, ग्रामीण उपजीविकेस चालना देण्यासाठी आणि शाश्‍वत व हिरव्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी बांबूच्या प्रचंड संभाव्यतेवर भर देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT