Butterfly Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Butterfly Village : पारपोली बनणार फुलपाखरांचे गाव

Butterfly Conservation : वनविभाग आणि स्थानिक वन समितीच्या सयुंक्त विद्यमाने पारपोली येथे तीन दिवशीय फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

एकनाथ पवार

Sindhudurg News : ‘‘जैवविविधतेचा खजिना असलेल्या पारपोलीत (ता. सावंतवाडी) विविध प्रकारची फुलपाखरे आढळून येतात. त्यांचे संवर्धन आणि सरक्षंण करून पारपोली हे गाव जगाच्या नकाशावर फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखले जाईल,’’ असे मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केले.

वनविभाग आणि स्थानिक वन समितीच्या सयुंक्त विद्यमाने पारपोली येथे तीन दिवशीय फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते झाले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी किशोर तावडे, उपवनसरंक्षक एस. नवकिशोर रेड्डी, सहाय्यक उपवनसरंक्षक डॉ. सुनील लाड, महेंद्र केणी, अतुल काळसेकर, अशोक दळवी, प्रभाकर सावंत, कृष्णा नाईक आदी उपस्थित होते.

श्री. केसरकर म्हणाले, ‘‘उंच कड्यावरून कोसळणारे धबधबे आणि विशिष्ट वातावरण यामुळे आंबोलीची ओळख जगभरात पोहोचली. त्याचप्रमाणे विविध फुलपाखरांमुळे पारपोली जगाच्या नकाशावर येईल.

त्यामुळे पारपोलीला फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. पर्यटन वृद्धीसाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भविष्यात जगभरातील पर्यटक पारपोलीत यावेत, यासाठी प्रयत्न करू.’’

‘‘सर्किट टुरिझम’ कोल्हापूरला जोडणार’

पारपोली, कलंबिस्त, सांगेली, गेळे, चौकुळ, आंबोली, केसरी हा परिसर सर्किट टुरिझम बनवून तो कोल्हापूरला जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरातील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, गहू तसेच काय आहेत आजचे कांदा दर?

Narendra Modi : काँग्रेसने गरिबांना लुटले ः मोदी

Sharad Pawar : तासगाव साखर कारखान्याची दयनीय अवस्था करणाऱ्यांना जागा दाखवा; शरद पवार

Irrigation Project : सिंचन प्रकल्प केव्हा पूर्ण होणार?

Sindkhedraja Assembly Constituency : सिंदखेडराजात काका-पुतणी रिंगणात

SCROLL FOR NEXT