Parner Market Committee Election Agrowon
ॲग्रो विशेष

Parner Market Committee Election : पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीत चुरस वाढणार

पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली. १८ जागांसाठी २७ मार्च रोजी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला.

Team Agrowon

Nagar Market Committee Election Update : पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक (Agriculture Produce Market Committee Election) जाहीर झाली. १८ जागांसाठी २७ मार्च रोजी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. २८ एप्रिलला मतदान होत आहे. बाजार समिती निवडणूक जाहीर होताच तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग वाढला.

सध्या बाजार समितीवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) अशी तिहेरी लढतीची शक्यता आहे. प्रशासक येण्याआधी येथे राष्ट्रवादीची सत्ता होती.

पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ही एकमेव सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. पारनेर सहकारी साखर कारखाना विक्रीस गेला आहे, तर तालुका सहकारी दूध संघ, खरेदी-विक्री संघ हे फक्त नावापुरते अस्तित्वात आहेत.

सद्यःस्थितीत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच सुस्थितीत आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात २२७ कोटींची उलाढाल झाली होती व दोन कोटी २७ लाख रुपयांचा नफा झाला.

बाजार समितीच्या १८ जागांसाठी २३ मार्चपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच भारतीय जनता पक्ष तयारीस लागले आहेत. त्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांचे मेळावेही घेतले.

त्यामुळे आता यातील कोण कोणाशी युती करणार वा स्वतंत्र लढणार, हे मात्र काळच ठरविणार आहे. विद्यमान संचालक मंडळास एक वर्षाची मुदतवाढ मिळाली होती. एक नोव्हेंबरपासून बाजार समितीवर सहायक निबंधक गणेश औटी यांची प्रशासक म्हणून नेमणूक झाली.

आता निवडणूक होत असल्याने बाजार समितीवर पुन्हा एकदा लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात येणार आहे. एकूण जागा १८ आहेत. कृषी, पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी सेवा संस्था ११, तर ग्रामपंचायत मतदारसंघ चार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Crop: आंबा उत्पादनात ५० टक्के घट होण्याचा अंदाज

Maize Farmers: मका उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

Cotton Purchase: हमीभावाचा आधार नाही; कापूस गेला कमी दरात

Animal Market Action: लकडगंजमधील वन्यजीवांच्या बेकायदा बाजारावर होणार कारवाई

Natural Farming: नांदेडला डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाला गती

SCROLL FOR NEXT