Cotton Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Rate : परभणी, जळगावात कापूसावरून शेतकरी आक्रमक; शेतकऱ्यांचा रस्ता रोको

Block the road of farmers : कापूस खरेदी आणि पडलेल्या कापसाच्या दरावरून परभणी आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी यामागणीवरून रस्ता रोको करत संताप व्यक्त केला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Parbhani/Jalgaon News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कांदा, सोयाबिन आणि कापसाचे भाव पडलेले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. तर कांदा, सोयाबिन आणि कापसाला योग्य भाव देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून केली जात आहे. दरम्यान परभणी आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या कारणासाठी रस्ता रोको केला.

परभणीत शेतकऱ्यांचा गोंधळ

परभणी जिल्ह्यात कापूस विक्री करताना तो थेट घेतला जात नाही. येथील व्यापारी बाहेर खाजगीमध्ये कापूस विक्री करायला बळजबरी करत असल्याची तक्रार कापूस विकण्यास गेलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे. ही खरेदी बाजार समितीत करावी अशी मागणी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी केली.

तसेच जवळपास अर्धा तास शेतकऱ्यांनी रस्ता अडवून धरला. यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे गोंधळ उडाला. पोलिसांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

जळगावात भावावरून शेतकरी आक्रमक

कापसाला प्रतिक्विंटल १५ हजारांचा भाव देऊन शासनाने तालुकास्तरावर खरेदी करावी, नाफेडच्या माध्यमातून शासनाने कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार ५०० रुपये भावाने खरेदी करावा, पारोळा, एरंडोल, भडगाव, धरणगाव या तालुक्यांतील शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम अदा करावी, यांसह विविध मागण्यांसाठी जळगावात शेतकरी आक्रमक झाले होते.

या मागणीसाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेतर्फे एरंडोल येथील कासोदा नाक्यानजीक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच पारोळा, एरंडोल, भडगाव, धरणगाव येथील कापूस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याच्या गळ्यात माळा घालून सरकारचा निषेध केला. त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन संघटनेतर्फे तहसिलदार सुचित्रा चव्हाण यांना देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tenant Farmers: भाडेपट्ट्याने शेतजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार पीक कर्ज, पीक विम्याचा लाभ, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Amaravati Water Crisis: अमरावती जिल्ह्यात लागताहेत २० टँकर

Water Scarcity: सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा; एक टँकर सुरू

MIDC Project: ‘एमआयडीसी’विरोधात आरपारच्या लढाईचे संकेत

Halad Nuksan: वादळी पावसामुळे हळदीचे नुकसान

SCROLL FOR NEXT