Papaya Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Papaya Rate : खानदेशात पपई दरात सुधारणा

Papaya Market : प्रतिकिलो १ ते सव्वा रुपया वाढ; मागणी वाढली

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Jalgaon News : जळगाव ः खानदेशात पपई दरात मागील चार ते पाच दिवसांत किलोमागे एक ते सव्वा रुपयाने सुधारणा झाली. शेतकऱ्यांना थेट किंवा शिवार खरेदीत प्रतिकिलो पाच रुपये दर सध्या जळगावातील अनेक भागांत मिळत आहे.

मागील सात ते आठ दिवसांत पपईची आवक कमी झाली आहे. नंदुरबारातील शहादा, तळोदा, नंदुरबार भागातील आवकेत मोठी घट झाली आहे. कारण या भागात २५ ते २७ टक्के पपई बागा शेतकऱ्यांनी काढून फेकल्या आहेत.

७८६ वाणाच्या पपई बागांत विषाणूजन्य रोग वाढले. तसेच दरही परवडणारे नव्हते. यामुळे शेतकऱ्यांनी बागा काढून त्यात उन्हाळ पिकांची लागवड केली. काहींनी पपईच्या बेडवर केळीचे उत्पादन चांगले मिळत असल्याने केळी लागवडीचे नियोजन केले आहे.

पपईची लागवड नंदुरबारात सर्वाधिक ५२०० हेक्टरवर झाली होती. ही लागवड यंदा वाढली होती. परंतु लागवड उशिरा झाल्याने आवक डिसेंबरमध्ये सुरू झाली. या काळात दर कमी होते. जळगाव जिल्ह्यातही अशीच स्थिती होती. आवक सर्वत्र वाढल्याने दरांवर दबाव वाढला.

दर परवडेनासे झाले. यातच नंदुरबार, जळगाव, धुळे जिल्ह्यांत ७८६ वाणाच्या पपईवर विषाणूजन्य रोगांची समस्या वाढली. यामुळे पिके काढून फेकावी लागली. नंदुरबारात या समस्येने तब्बल २५ टक्के पपईखालील क्षेत्र रिकामे झाले आहे.

गेल्या काही दिवसांत पपई दरात सतत घसरण झाली. या महिन्यात नंदुरबारात पपई दराचा तिढा होता. शेतकरी पाच रुपये प्रतिकिलो दर जागेवर किंवा थेट खरेदीत मिळावेत, अशी मागणी करीत होते. यामुळे नंदुरबार, धुळ्यातील अनेक भागांत पपईची काढणी ठप्प होती.

परंतु पपईची खरेदी मागील आठवड्यात सुरू झाली असून, आवक कमी असल्याने दरातही सुधारणा झाली आहे. आठ ते १० दिवसांपूर्वी पपईस जागेवर प्रतिकिलो कमाल तीन रुपये दर मिळत होता. सध्या साडेचार ते पाच रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. पपईची आवक खानदेशात सध्या रोज २७ ट्रक (एक ट्रक १६टन क्षमता) होत आहे. ही आवक कमी झाली आहे. सर्वाधिक आवक नंदुरबारात होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT