Papaya Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Papaya Cultivation: खानदेशात पपई लागवड सुरूच; क्षेत्र वाढण्याचे संकेत

Papaya Farming: खानदेशात यंदाही पपई लागवडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील हंगामाच्या तुलनेत क्षेत्रवाढीची चिन्हे असून, नंदुरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यात शेतकरी पपई शेतीकडे वळत आहेत. बाजारात स्थिर दर आणि चांगल्या नफ्यामुळे शेतकऱ्यांनी या फळशेतीस पसंती दिली आहे.

Team Agrowon

Jalgaon News: खानदेशात हंगामातील पपईची लागवड सुरू आहे. यंदा क्षेत्र वाढेल, असे संकेत असून, पपई रोपांचे दरही वाढले आहेत. पपईदर टिकून असल्याने अनेकांची पपईस पसंती आहे.

खानदेशात पपईसाठी नंदुरबार जिल्हा आघाडीवर असून, २०२३-२४ मध्ये जिल्ह्यात पाच हजार २०० हेक्टरवर पपईची लागवड झाली होती. नंदुरबारातील शहादा तालुक्यातील लागवड साडेचार हजार हेक्टरवर झाली होती. जळगाव जिल्ह्यात सुमारे १२०० हेक्टर आणि धुळ्यातही सुमारे एक हजार हेक्टरवर लागवड झाली होती.

खानदेशात ७८६ व १५ नंबर पपई वाणांची लागवड केली जाते. त्यात ७८६ वाणांवर रोग वाढत असल्याने गत हंगामात १५ नंबर वाणाच्या लागवडीला अनेकांनी पसंती दिली. परंतु कमी पाऊस व नैसर्गिक समस्यांमुळे पपईचे उत्पादन मागील वेळेस कमी आले. मागील वेळेस रोपांची टंचाई होती. यामुळे अनेक शेतकरी वेळेत पपईची लागवड करू शकले नाहीत. यामुळे उत्पादन डिसेंबरमध्ये सुरू झाले. दरही कमी मिळाले.

यंदा मात्र पपईचे दर स्थिर आहेत. सध्या प्रतिकिलो १७ रुपये दर जागेवर मिळत आहे. यंदाच्या हंगामात ऑक्टोबरमध्ये सरासरी ३५ रुपये प्रतिकिलो, नोव्हेंबरमध्ये सरासरी २० ते २३ रुपये प्रतिकिलो आणि डिसेंबरमध्ये सरासरी १० प्रतिकिलोचा दर पपईला शेतकऱ्यांना जागेवर मिळाला. दरात मोठी पडझड झाली नाही. पपई पिकात नफा काहींना बरा राहिला. ही समस्या लक्षात घेऊन अनेकांनी पपई पिकास पसंती दिली आहे. २०२४-२५ मध्ये लागवडीबाबत प्रतिसाद आहे. पपई रोपे दरही वाढले आहेत.

परंपरेनुसार नंदुरबारातील शहादा, तळोदा, जळगावातील चोपडा, यावल, जामनेर भागांत आगाप लागवड डिसेंबरपर्यंत झाली आहे. धुळ्यातील शिरपुरातही काही शेतकरी पपईची लागवड करीत आहेत. पुढे उष्णता सुरू होईल. त्यापूर्वी पीक बऱ्यापैकी स्थिर होऊन वाढीस लागावे व पुढे चांगले दर मिळावेत, असेही नियोजन आगाप लागवडीमागे आहे. यातच पपई लागवड खानदेशात यंदा सुमारे एक ते दीड हजार हेक्टरने वाढेल, अशी स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT