PDKV Akola Agrowon
ॲग्रो विशेष

Nation Council : ‘पंदेकृवि’मध्ये आजपासून राष्ट्रीय परिषद

PDKV Akola : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गुरुवार (ता. ७) आणि शुक्रवारी (ता. ८) ‘नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान व कृषीमध्ये उद्योजकता विकास’ या महत्त्वपूर्ण विषयावरील राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.

Team Agrowon

Akola News : स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गुरुवार (ता. ७) आणि शुक्रवारी (ता. ८) ‘नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान व कृषीमध्ये उद्योजकता विकास’ या महत्त्वपूर्ण विषयावरील राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेद्वारे आणि पीडीकेव्ही रिसर्च व इनक्युबेशन फाउंडेशन आणि कृषी अभियंते राष्ट्रीय संस्था-अकोला चाप्टरच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले.

परिषदेचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. शरद गडाख भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (कृषी अभियांत्रिकी) डॉ. एस. एन. झा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी राहतील. तसेच संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण संचालक डॉ. श्यामसुंदर माने, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, कुलसचिव सुधीर राठोड, प्रमोद पाटील, डॉ. सुरेंद्र काळबांडे यांचीही उपस्थिती राहणार आहे.

काळाची गरज ओळखून केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशपातळीवर नवीन व उदयोन्मुख उद्योजकांना त्यांचे उद्योग स्थापनेसाठी, उद्योजकता वाढीसाठी लागणारे पोषक वातावरण व आवश्यक सोयीसुविधांची माहिती व पुरवठा तसेच कृषी क्षेत्रातील उद्योजकता वाढीस लागून एकूणच कृषी क्षेत्राच्या ऊर्जितावस्थेसाठी गती प्राप्त करून देण्याच्या उदात्त हेतूने परिषदेमध्ये चर्चा होईल.

यात प्रामुख्याने शेतीमालाचे मूल्यसाखळी व्यवस्थापन, कृषी क्षेत्रातील पुरवठा साखळी, कृषी क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान, रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता, कृषी निविष्ठा सेवा क्षेत्रातील प्रतिनिधी, सेंद्रिय शेती, शेती यांत्रिकीकरणासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, कृषी अर्थव्यवस्थेमध्ये स्वयंरोजगाराला वाव, स्वयं रोजगाराच्या जैवतंत्रज्ञान विषयक पैलू, स्वयंरोजगारासाठी उद्यान विद्या प्रक्रियाविषयक मॉडेल,

ग्रामीण भागातील ऊर्जा आराखडा व ऊर्जा वापर, कृषीतील कचरा व्यवस्थापन, कृषिक्षेत्रात बायोमास ऊर्जा ऊर्जितीकरणासाठी व्यावसायिक मॉडेल, व्हर्टिकल फार्मिंग, प्रिसिजन फार्मिंग, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धनामध्ये रोजगाराच्या संधी, उद्योजकता विकासासाठी वन उपजांचे व्यवस्थापन, कापणी पश्चात तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान स्टार्टअपमधील सद्यःस्थितीतील आव्हाने व भवितव्य, अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांचा यात अंतर्भाव आहे.

नामांकित कृषी शास्त्रज्ञांद्वारे सादरीकरण

परिषदेत मुख्य सत्रामध्ये देशपातळीवरील नामांकित कृषी शास्त्रज्ञांद्वारे कृषीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, आयओटी व ड्रोनचा वापर, लहान व सीमान्त शेतकऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण कापणीपश्चात तंत्रज्ञान व विपणन तंत्र आणि कृषी स्टार्टअप परिसंस्थेचा विकासासाठी इन्क्युबेशन केंद्रांची भूमिका तसेच माहिती संप्रेषण तंत्रज्ञान व वातावरणीय कृषी नियंत्रण या काळाची गरज असलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांचे सादरीकरण होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT