Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Compensation Survey : खानदेशात नुकसानीचे पंचनामे सुरू

Compensation Update : सलग दोन दिवस गारपीट व वादळ झाल्याने केळी व अन्य रब्बी पिकांचे नुकसान झाले असून, पंचनाम्यांचे काम सुरू आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात अवकाळी पावसामुळे मोठी पीकहानी झाली आहे. सलग दोन दिवस गारपीट व वादळ झाल्याने केळी व अन्य रब्बी पिकांचे नुकसान झाले असून, पंचनाम्यांचे काम सुरू आहे.

सोमवारी (ता. २६) व मंगळवारी (ता. २७) खानदेशातील विविध भागांत गारपीट व पाऊस झाला. यात नुकसान व नुकसान पातळी वाढली आहे. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे व परिसरात, गिरणा काठी केळी बागा भुईसपाट झाल्या. पारोळा, अमळनेर, चोपडा, धरणगाव, भडगाव, पाचोरा भागांतही मोठा फटका पिकांना बसला.

धुळ्यातील धुळे, शिंदखेडा आदी भागांतही पावसाने हानी झाल्याची माहिती आहे. पंचनाम्यांचा अंतिम अहवाल गुरुवारी (ता. २९) येईल, अशी माहिती मिळाली. अनेक भागांत महसुली व कृषी कर्मचारी पोहोचलेलेच नाहीत.

जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुक्यातील मोंढाळे येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देऊन पीकहानीची माहिती घेतली. धरणगावातील पष्टाणे, गंगापुरी, भोणे धानोरा, निशाणे आदी भागांतही मोठी हानी झाली आहे. चाळीसगावातील मेहुणबारे व भागात केळी, कांदा, ज्वारी, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पारोळा तालुक्यातील पिंपरी, आडगाव, बोळे, करमा, मोंढाळे, तामसवाडी, बहादरपूर, विचखेडे, उंदीरखेडे, शिरसमणी, टिटवी आदी भागांत रब्बी पिकांची मोठी नासाडी झाली आहे. चोपडा तालुक्यात सनपुले, तांदलवाडी, दोंदवाडे, चहार्डी, निमगाव, गरताड, धनवाडी आदी भागांतही रब्बी पिकांना गारपिटीचा फटका बसला. धुळ्यातीलही अनेक गावांत नुकसान झाले असून, पंचनामे कृषी व महसुली कर्मचारी करीत आहेत.

नुकसान वाढतेच

अवकाली पाऊस व गारपिटीमुळे नुकसान वाढले आहे. सलग दोन दिवस गारपीट व पाऊस झाला. यामुळे ही नुकसान पातळी वाढली. खानदेशात सुमारे १३ हजार हेक्टरला फटका बसल्याचा अंदाज आहे. त्यात चाळीसगाव, पारोळा, चोपडा व धऱणगावात अधिकचे नुकसान झाले आहे. अंतिम अहवाल गुरुवारी प्राप्त होणार असून, तो तातडीने शासनाला पाठविला जाईल. यानंतर भरपाईसंबंधीची कार्यवाही होईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT