Panchaganga River agrowon
ॲग्रो विशेष

Panchaganga River : कोल्हापूर प्रदूषण मंडळाला जाग कधी येणार?, पंचगंगा नदीत लाखो मासे मृत

Panchaganga River Pollution : उसाचा हंगाम सुरू झाला की कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणात प्रदुषीत होत असते.

sandeep Shirguppe

Panchaganga River Kolhapur : उसाचा हंगाम सुरू झाला की कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणात प्रदुषीत होत असते. मागच्या कित्येक वर्षांपासून उसाचा हंगाम सुरु झाला की जिल्ह्यात पंचगंगा नदी किनाऱ्यावर मृत माशांचा खच हा नित्याचाच झाला आहे.

दरम्यान पंचगंगा नदीमध्ये प्रदुषीत पाणी सोडल्याने लाखो मासे मृत्यूमुखी पडले आहेत. मृत मासांना गोळा करत मच्छीमार हेच मासे विक्रीसाठी बाजारात घेऊन येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

तावडे हॉटेल, स्वामी शांती प्रकाश घाट गांधीनगर आणि वळीवडे सुर्वे बंधारा येथे पंचगंगा नदीपात्रात प्रदूषणामुळे लाखो मासे मृत झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान कोल्हापूर महापालिका आणि प्रदुषण मंडळाकडून कोणतीही कारवाई केली नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पंचगंगा नदीप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने याचा थेट परिणाम जलचर प्राण्यांवर होत आहे. दूषित पाण्यामुळे नदीपात्रातील जलचर प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. असे असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे.

सोमवारी शिरोली पुलाखाली, तसेच गांधीनगर येथील स्वामी शांती प्रकाश घाट आणि वळीवडे येथील सुर्वे बंधारा नदीपात्रात अक्षरश: मृत माशांचा खच पडला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.

मासे मृत झाल्याने पाणी प्रदूषणात वाढ होत आहे. वळीवडे येथील नदीपात्रातील पाणी जनावरांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी वापरले जाते. परंतु, असे दूषित पाणी जनावरांच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

लवकरात लवकर मृत माशांची विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Petrol Pump Closure: बुलडाणा जिल्ह्यात निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद

Onion Prices Issues: बागलाण तहसीलमध्ये कांदा दरासाठी ठिय्या

Medical Shop Strike: औषध विक्रेत्यांचा आज संप

Jal Jeevan Mission: नळ पाणी योजनांच्या कामांना गती द्या : आमदार यड्रावकर

Underwater Tourism: सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनात ‘गुलदार’ची भर

SCROLL FOR NEXT