Paddy Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Sowing : मुळशीत धूळवाफेवरील भातपेरणीला सुरवात

Kharif Season : मुळशीत मॉन्सनपूर्व पावसाने यावर्षी हजेरी लावली आणि तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांनी पर्जन्यराजाची आणखी वाट न पाहता पारंपरिक पद्धतीने धूळवाफेवर भात पेरणीला सुरवात केली .

Team Agrowon

Pune News : मुळशीत मॉन्सनपूर्व पावसाने यावर्षी हजेरी लावली आणि तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांनी पर्जन्यराजाची आणखी वाट न पाहता पारंपरिक पद्धतीने धूळवाफेवर भात पेरणीला सुरवात केली . येथील शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर धूळ वाफ पेरणीला सुरुवात केली आहे.

गेल्या महिन्याभरापासूनच येथील शेतकऱ्यांनी राब तयार करून दाढ भाजणीला सुरवात केली. भात रोपे तयार करण्याच्या क्षेत्रात जनावरांचे शेणखत व खांडे पसरून त्यावर गवत आणि पालापाचोळा यांचा थर रचला जातो. नंतर हे सर्व थर पेटवून दिल्याने भातरोपांची जमीन तापते.

तेथील माती तापल्याने तणांच्या बियांचा नाश होतो आणि भात पेरल्यानंतर त्यात तण उगवत नाहीत. त्यानंतर तयार झालेल्या क्षेत्राची कुळवणी केली जाते. कुळवणीनंतर भाताचे बियाणे पेरले जाते. त्यावर पुन्हा औताच्या साह्याने कुळवणी करून बिया झाकल्या जातात.

राब केल्यानंतरच्या कोरड्या मातीत भाताची पेरणी करणे म्हणजेच धूळवाफेवरील पेरणी म्हणतात. तालुक्यात पंधरा दिवसांपासूनच धूळ वाफेवर पेरणीला सुरवात झाली आहे. मुठा, मोसे, रिहे, कोळवण खोरे तसेच धरण भागातील शेतकऱ्यांनी भात पेरणीला सुरुवात केली आहे.

मुठा खोऱ्यातील माळेगांव येथील शेतकऱ्यांनी धुळ वाफेवर भात पेरणीला सुरुवात केली. येथील शेतकरी माजी सरपंच के.बी.चौधरी यांच्या शेतात भात पेरणीची सुरुवात करून गावातील अंकुश गुढेकर, बाळासाहेब चौधरी, गणेश चौधरी, मारुती गुढेकर, ज्ञानोबा गुढेकर आदी शेतकऱ्यांनीही भात पेरणी केली. या सर्व शेतकऱ्यांच्या पेरणीच्या कामासाठी अंकुश गुढेकर यांच्या बैलजोडीचे औत वापरले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief : दुष्काळ निवारणात कसूर केल्यास कारवाई

Mula Canal Breach : चांद्याजवळ मुळा उजव्या कालव्याचा भराव खचला

Fodder Management : पिण्याचे पाणी, चाऱ्याचे तातडीने नियोजन करा

Land Acquisition: भूमी अधिग्रहण कायदा रद्द करा : लक्ष्मीकांत कौठकर

Soil Moisture: दुष्काळाच्या परिस्थितीत मातीतील ओलावा कसा टिकवावा?

SCROLL FOR NEXT