Paddy Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५५ हजार हेक्टरवरील भातपीक कापणी पूर्ण

Paddy Production : येत्या आठ दिवसांत उर्वरित ७ हजार हेक्टरवरील भातपीक कापणी पूर्ण होईल असा अंदाज आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यातील ६२ हजार हेक्टरपैकी ५५ हजार हेक्टरवरील भातपीक कापणी पूर्ण झाली आहे.येत्या आठ दिवसांत उर्वरित ७ हजार हेक्टरवरील भातपीक कापणी पूर्ण होईल असा अंदाज आहे. पावसामुळे यावर्षी दहा ते बारा दिवस कापणी लांबली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात ६२ हजार हेक्टरवर भातपीक लागवड केली जाते. यावर्षी अनियमित पावसामुळे भातरोपवाटीका तयार करण्याच्या कामांपासून भातरोप लागवडीच्या कामाचे वेळापत्रक कोलमडले. भातरोपवाटीकाची काम रखडल्यामुळे आपसुकच भातरोप लागवडीला विलंब झाला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भातरोप लागवडीचे काम सुरू होते.

परंतु पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ११ हजार १९० हेक्टरवर भातरोपांची लागवड लवकर झाली होती. ही पिके सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात परिपक्व झाली. परंतु संपूर्ण सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहीले. भातपीक परिपक्व असुनही शेतकऱ्यांना कापणी करता आली आहे. त्यानंतर ऑक्टोबरचा पहिला आठवडा पावसाचा राहीला.

त्यानंतर सकाळच्या सत्रात पावसाने उघडीप द्यायला सुरुवात केली. या कालावधीत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील भातपीक कापणीला सुरुवात केली. पावसामुळे काही भागात पिकाचे नुकसान झाले.पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील पिकांची कापणी करतानाच तिसऱ्या टप्प्यातील ५१ हजार हेक्टरवरील भातपीक परिपक्व व्हायला सुरुवात झाली.

या कालावधीत देखील सतत पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची कुचंबणा झाली. परंतु गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी जलदगतीने भातपीक कापणी केली. आत्तापर्यंत ६२ हजार हेक्टरपैकी ५५ हजार हेक्टरवरील भातपीक कापणी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक; घरच्या घरी तपासा दुधातील भेसळ

River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून

Land Acquisition: ‘शक्तिपीठ’साठी पारदर्शक भूसंपादन हवे

NA Permission Rule: शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ परवानगीची अट रद्द ; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT