Paddy Crop Damage :  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Damage : पुणे जिल्ह्यात पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान

Post Monsoon Rain : ऐन दिवाळीत झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. गेले दोन दिवस पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत ढगाळ वातावरण होते.

Team Agrowon

Pune News : पुणे जिल्‍ह्याच्‍या पश्‍चिम घाट परिसरात गुरुवारी (ता.९) रात्री झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने काढणीस आलेल्या आणि काढणी झालेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

ऐन दिवाळीत झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. गेले दोन दिवस जिल्ह्याच्या विविध भागांत ढगाळ वातावरण होते. तर गुरुवारी (ता.९) रात्री झालेल्या पावसाने शेतात पाणी साठल्याने काढणीला आलेला आणि कापणी झालेला भात भिजल्याने नुकसान झाले आहे.

जिल्‍ह्याच्या पश्‍चिम घाट परिसर असलेल्या मावळ, मुळशी, भोर, जुन्नर, खेड, आंबेगाव परिसरांत भाताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोळवण (ता. मुळशी) परिसरात अचानक झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने भातशेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुळशी तालुक्यात इंद्रायणी तांदळाचे मुख्य पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या मागील दोन दिवसांपासून दिवसभर ढगाळ वातावरण होते. याचाच परिणाम म्हणून आज परिसरात पाऊस पडला आहे. कापणी झालेले भात पीक या पावसाने भिजले आहे.

दिवाळीची लगबग सुरू असतानाच मॉन्सूनोत्तर पावसामुळे मुळशी तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या आनंदावर विरजण पडले आहे, हाततोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. भात भिजल्याने उत्पादित होणाऱ्या तांदळाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होणार आहे. या वर्षी अगोदरच पाऊस कमी झाल्याने उत्पादन घटले असून, त्यात आता पाऊस पडून भात भिजले.

अशा परिस्थतीमध्ये शासनाकडून मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी भाताचा पीकविमा काढला आहे, त्या शेतकऱ्यांनी तत्काळ नुकसानीची सूचना फोनवर किंवा ॲपद्वारे पीकविमा कंपन्यांकडे ७२ तासांच्या आत कळवावी, असे आवाहन शेतकरी दत्ता शेळके, हरिभाऊ दुर्गे यांनी इतर शेतकऱ्यांना केले आहे.

जुन्नर तालुक्यातील सुकाळवेढे, हिवरे तर्फे मिन्हेर आंबे हातवीज, आपटाळे, कुकडेश्‍वर आदी गावांमध्ये झालेल्या पावसाने देखील भाताचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून, नुकसान भरपाई देण्यची मागणी आदिवासी प्रकल्प संचालनालये सदस्य दत्ता गवारी यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT