Banana Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Group Farming : पढावदच्या गटशेतीचा प्रयोग प्रेरणादायी

Banana Farming : पढावद (ता. शिंदखेडा) येथील कृषिभूषण ॲड. प्रकाश पाटील यांची गटशेती, जय खानदेश कृषी प्रोड्यूसर कंपनी व कृषिभूषण सीडची कृषी अधिकाऱ्‍यांनी पाहणी केली.

Team Agrowon

Dhule News : पढावद (ता. शिंदखेडा) येथील कृषिभूषण ॲड. प्रकाश पाटील यांची गटशेती, जय खानदेश कृषी प्रोड्यूसर कंपनी व कृषिभूषण सीडची कृषी अधिकाऱ्‍यांनी पाहणी केली. शेतकऱ्‍यांसाठीचे विविध प्रयोग प्रेरणादायी असल्याचे सांगूत गटशेतीचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, उपसंचालक प्रज्ञा पवार, कृषी अधिकारी साबळे, तालुका कृषी अधिकारी नागरे यांच्यासह कृषी विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.

या पाहणीत सामुदायिक शेततळे (सव्वा कोटी लिटर क्षमता), तापी नदीच्या सुलवाडे बॅरेजमधून सहा किलोमीटरवरुन उपसा सिंचन योजना, ठिबक स्वयंचलित यंत्रणा व निर्यातक्षम केळीची पाहणी केली.

जय खानदेश कृषी प्रोड्यूसर कंपनीच्या दादर (परभणी सुपर मोती) या मुलभूत बियाण्यापासून पायाभूत बियाण्याचे बिजोत्पादन प्लॉट, पीकेव्ही दोन बिजोत्पादनाच्या प्लॉटची पाहणी करण्यात आली.

जय खानदेश कृषी प्रोड्यूसर कंपनीच्या बियाणे प्रक्रिया केंद्राची त्यांनी माहिती घेतली. यावर्षी कंपनीने एक हजार ८०० ते एक हजार ९०० क्विंटल दादरचे प्रमाणित बियाणे व पाचशे क्विंटल हरभरा बियाणे तयार करणार असल्याची माहिती कृषीभूषण अॅड. पाटील यांनी दिली. या वेळी शरद निकम, आनंद ठाकरे, मदन परदेशी, योगराज पाटील, आधार ठाकरे, रवींद्र माळी, विलास ठाकरे आदी शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT