Agriculture Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Scheme : नाशिक विभागात २० हजार शेतकऱ्यांना १४५ कोटी रुपयांचा लाभ

Agriculture Department : कृषी विभागामार्फत खरीप हंगाम २०२५ साठी विविध कृषी योजनांच्या अनुषंगाने शेतकऱ्यांची निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुासर करण्यात आली आहे.

Team Agrowon

Nashik News : कृषी विभागामार्फत खरीप हंगाम २०२५ साठी विविध कृषी योजनांच्या अनुषंगाने शेतकऱ्यांची निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुासर करण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नाशिक विभागातील २० हजार १७० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

त्यांना एकूण १४५.६२ कोटी रुपयांचा थेट लाभ मिळणार आहे, अशी माहिती नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी दिली. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी ३१ मेपर्यंत आवश्यक कागदपत्रे ‘महाडीबीटी’ पोर्टलवर सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

२१ मे ला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय खरीप नियोजन बैठकीत या नव्या पद्धतीस मान्यता मिळाली आहे. लाभार्थ्यांची यादी महाडीबीटी पोर्टल, कृषीच्या संकेतस्थळावर तसेच क्षेत्रीय कृषी अधिकाऱ्यांच्या लॉगइनवर उपलब्ध आहे.

३१ मेपर्यंत कागदपत्रे सादर करावीत

निवड झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा फार्मर आयडी वापरून माहिती तपासावी व ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी नाही त्यांनी नजीकच्या सार्वजनिक सेवा केंद्रांवर जाऊन तो प्राप्त करून घ्यावा.

३१ मेपर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. कागदपत्रे सादर न केल्यास त्यांचा अर्ज आपोआप रद्द केला जाणार आहे. योग्य कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना त्वरित पूर्ण संमती प्रदान केली जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : आशिया देशांना २०२५ मध्ये हवामान संकटाचा मोठा फटका; उष्णतेच्या लाटा, पूर आणि दुष्काळामुळे वाढले नुकसान

Fruit Orchard Farming: फळबागकेंद्रित शेतीतून उल्लेखनीय प्रगती

Gold Price : सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे आर्थिक ताण

El Nino Crisis: ‘एल निनो’ आणि कोरडा उपदेश

ZP Health Sub Centre Certification: ‘झेडपी’ची दोन आरोग्य उपकेंद्रे राज्यात अव्वल; सहा केंद्रांना गुणवत्ता दर्जा प्रमाणपत्र

SCROLL FOR NEXT