Cashew Pest  Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Pest : ‘टी मॉस्कीटो बग’ चा काजू पिकांवर प्रादुर्भाव

Tea Mosquito Bug : सततचे ढगाळ वातावरण आणि लांबलेला पाऊस यामुळे काजूपिकांवर ‘टी मॉस्कीटो बग’चा प्रादुर्भाव वाढला आहे.

एकनाथ पवार

Sindhudurg News : जिल्ह्यातील काजू पिकांवर ‘टी मॉस्कीटो बग’किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. सततचे ढगाळ वातावरण आणि नोव्हेंबर अखेरीपर्यंत झालेला पाऊस याचा हा परिणाम आहे, असे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. किडीमुळे काजू पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत पाऊस झाला. त्यानंतर अनेक दिवस सतत ढगाळ वातावरण राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांना काजू बागांमध्ये फवारण्यांसह विविध काम करणे शक्य झाले नाही. सततचे ढगाळ वातावरण आणि लांबलेला पाऊस यामुळे काजूपिकांवर ‘टी मॉस्कीटो बग’चा प्रादुर्भाव वाढला आहे.

नोव्हेंबरपासूनच हा प्रादुर्भाव सुरू आहे. परंतु पावसामुळे वेळेत फवारण्या न घेता आल्यामुळे त्यात वाढ झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यात हा प्रादुर्भाव सर्वाधिक दिसून येत आहे.

एकीकडे कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे पुरेशी थंडी नसल्यामुळे काजूला अपेक्षित पालवी आणि मोहोर देखील आलेला नसल्यामुळे बागायतदारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आहे.

जिल्ह्यात ७२ हजार हेक्टरवर काजुपिक लागवड आहे. त्यातील ५९ हजार हेक्टर काजू उत्पादनक्षम आहे. गेली दोन-तीन वर्षे विविध कारणांमुळे सतत ढगाळ वातावरण, पाऊस, काजू बी दरातील चढ-उतार यामुळे मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे या वर्षीच्या हंगामावर बागायतदार अवलंबून आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage Issue: वरकुटे खुर्द, सराफवाडी पाझर तलाव कोरडा

20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

Bharati Plant: जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला ‘भारती’ नावाने मिळाली ओळख

SCROLL FOR NEXT