Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Politics : आमचा जाहीरनामा ‘जुमला’ नाही, तर आमची ‘गॅरेंटी’ : पवार

Sharad Pawar : आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. जुमलेबाजी करीत नाही. विधानसभेच्या जाहीरनाम्यातून महाविकास आघाडीने पाच गॅरेंटी दिली आहे. ती पूर्ण करण्याची जबाबदारीसुद्धा आम्हीच घेत आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. जुमलेबाजी करीत नाही. विधानसभेच्या जाहीरनाम्यातून महाविकास आघाडीने पाच गॅरेंटी दिली आहे. ती पूर्ण करण्याची जबाबदारीसुद्धा आम्हीच घेत असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपच्या जुमलेबाजीवर निशाणा साधला. राज्यात परिवर्तन होणार असल्याचाही दावा त्यांनी केला.

पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांच्यासाठी त्यांनी गुरुवारी (ता. ७) प्रचार सभा घेतली. या वेळी त्यांनी महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना तीन हजार रुपये महिना, महिलांना मोफत प्रवास, शेतकऱ्यांना तीन लाखांचे कर्ज, बेरोजगारांच्या हाताला काम, दर महिन्याला चार हजारांचे सहकार्य आणि २५ लाखांपर्यंत आरोग्य विमा देऊ व सगळी औषध मोफत देण्याची गॅरंटी आघाडीतर्फे देण्यात आली असून त्याची पूर्ततासुद्धा केली जाणार असल्याचे सांगितले.

सध्या राज्यात भाजपच्या विचाराचे शासन आहे. पाच वर्षांपूर्वी राज्यात पाच वर्षे भाजपची सत्ता होती. देशातही सत्ता होती. मात्र २०१९ च्या निवडणुकीत भाजपला सत्ता टिकवता आली नाही. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या राज्यात शेतकरी संकटात आहेत. आत्महत्या करीत आहेत. कष्टाची किंमत मिळत नाही म्हणून शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागत आहे.

राज्यातील जीवनमानाबाबात केंद्र सरकारने आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे. येथील महिलांची स्थिती वाईट आहे. हे सरकार महिलांना संरक्षण देऊ शकत नाही, शेतकऱ्यांचे हित बघत नाही आणि युवकांना रोजगार देऊ शकत नसल्याची टीका त्यांनी केली.

एकंदरीतच या सरकारच्या काळात भौतिक विकासाच्या नावाखाली सामान्यांचे प्रश्न मात्र दुर्लक्षित राहिले आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी भाजपच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल. हेच महत्त्वाचे काम आपल्याला करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT