Ravikant Tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Ravikant Tupkar : ...अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर घुसू; रविकांत तुपकरांचा इशारा

यावेळी पीकविमा, सोयाबीन कापूस शेतकरी, नुकसान भरपाई यावर तुपकरांनी आक्रमक भूमिका घेत शेती प्रश्नावर राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.

Dhananjay Sanap

विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण तापू लागलं आहे. त्यातच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी प्रश्नावर तुपकर आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. राज्यातील सोयाबीन-कापूस उत्पादकांना दरवाढीसाठी आंदोलनाचा करण्याचा इशारा तुपकर यांनी मंगळवारी (ता.२०) दिला.

तुपकर म्हणाले, "राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास २३ ऑगस्ट रोजी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात घुसू आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रात्यक्षिक मुख्यमंत्र्यांन वर्षा बंगल्यावर दाखवू, असा इशारा तुपकर यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिला.

यावेळी पीकविमा, सोयाबीन कापूस शेतकरी, नुकसान भरपाई यावर तुपकरांनी आक्रमक भूमिका घेत शेती प्रश्नावर राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. तुपकर म्हणाले, "महाराष्ट्रातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक मरणाच्या दारात उभा आहे. निवडणुकीच्या आधी सोयाबीनला ९ हजार आणि कापसाला १२ हजार रुपये दर द्यावा. तसेच शेतकरी कर्जमाफी द्यावी. आणि पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर घुसून शेतकरी आत्महत्याचं प्रात्यक्षिक दाखवू. त्यावेळी आमच्या जीवाला काही झालं तर त्यासाठी मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशाराही तुपकर यांनी दिला.

दरम्यान, येत्या काळात शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभं करू असंही तुपकर म्हणाले. तसेच आम्ही करत असलेलं आंदोलन पक्ष आणि संघटनांचं नसून शेतकऱ्यांचं आहे. शेतकरी आणि शेतमजूर आम्ही एकतर येऊन आंदोलनाचा नारा दिला आहे. त्यामुळं आंदोलन करणार अस्लयाची भूमिकाही तुपकरांनी स्पष्ट केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT