Solar Energy  Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Village : सौरग्रामसाठी एक गाव दत्तक घ्या

Tree Plantation : विविध संघटना व सेवाभावी संस्थांना सोबत घेऊन १९ जुलै रोजी जिल्ह्यात १५ वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे.

Team Agrowon

Dharashiv News : जिल्ह्यात विविध पवन व सौर ऊर्जा निर्मिती कंपन्या वीज निर्मितीचे काम करत आहेत. या कंपन्यांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर फंड) जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रत्येकी एक गाव संपूर्ण सौर ऊर्जेचा वापर करणारे सौर ग्राम विकसित करावे, तसेच पावसाळ्यात जिल्ह्यात यंदा हाती घेतलेल्या पन्नास लाख वृक्ष लागवड मोहिमेत योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यात पवन व सौर ऊर्जा निर्माण करणाऱ्या कंपन्यांची सौर ऊर्जा ग्राम आणि पन्नास लाख वृक्ष लागवडीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम गोडभरले, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चिन्मय दास, महावितरणचे लातूर परिमंडळचे मुख्य अभियंता गुरनुले, अधीक्षक अभियंता आडे, कार्यकारी अभियंता कुलकर्णी तसेच विविध पवन व सौर ऊर्जा निर्मिती कंपन्यांचे व्यवस्थापक उपस्थित होते.

पवन ऊर्जा कंपन्यांशी काही स्थानिक प्रश्‍न आहेत. त्या प्रश्‍नांची जाणीवपूर्वक सोडवणूक केली पाहिजे. संबंधित शेतकरी व ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊन ऊर्जा निर्मितीचे काम प्रभावीपणे करावे. पवन व सौर ऊर्जा निर्मिती कंपन्यांनी या व्यतिरिक्त आपल्या परिसरातील शाळा व सार्वजनिक संस्थांना ऊर्जेतून परिपूर्ण करावे.

विविध संघटना व सेवाभावी संस्थांना सोबत घेऊन १९ जुलै रोजी जिल्ह्यात १५ वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेत कोणत्या ठिकाणी वृक्ष लागवड करायची आहे, हे कंपन्यांनी निश्‍चित करावे. किमान एक हजार रोपांची लागवड करावी किंवा घनवन अर्थात मियावाकी पद्धतीने लागवड करावी, असे आवाहन श्री. पुजार यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT