Hirda Agrowon
ॲग्रो विशेष

Hirda Compensation : हिरडा नुकसान भरपाईसाठी केवायसी शिबिराचे आयोजन

Hirda Crop Damage : आधार कार्ड, बँक पासबुक, आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल सोबत घेऊन यावे. सदर ठिकाणी संगणक चालक मदत करणार आहेत.

Team Agrowon

Pune News : ‘‘आंबेगाव तालुक्यातील हिरडा उत्पादक शेतकऱ्यांची बँक खाते अपडेट (ई-केवायसी) करण्यासाठी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून प्रशासनाने डिंभे खुर्द, तळेघर व अडिवरे ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी (ता.१७) कागदपत्र पूर्तता शिबिराचे आयोजन केले आहे.

संबंधित शेतकऱ्यांनी हिरडा नुकसान भरपाई रक्कम आपल्या बँक खात्यात जमा होण्यासाठी बँक खते अपडेट करून घ्यावे. विनामूल्य ई-केवायसी सुविधा उपलब्ध आहे,’’ अशी माहिती आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी यांनी दिली.

ते म्हणाले, ‘‘आधार कार्ड, बँक पासबुक, आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल सोबत घेऊन यावे. सदर ठिकाणी संगणक चालक मदत करणार आहेत. गरज वाटल्यास शिबिराचा कालावधी वाढविला जाईल.’’

शिबिराचे ठिकाण व समाविष्ट गावे

डिंभे खुर्द ग्रामपंचायत कार्यालय : फुलेवाडी, राजेवाडी, गोहे खुर्द, गोहे बुद्रुक. तळेघर ग्रामपंचायत कार्यालय : साकेरी, महाळुंगे, पोखरी, चिखली, मेघोली, पाटण, कुशिरे बुद्रुक, कुशिरे खुर्द, फलोदे, सावरली,

तळेघर, पिंपरी, जांभोरी, निगडाळे, कोंडवळ, राजपूर, गाडेवाडी, तेरुंगण. अडिवरे ग्रामपंचायत कार्यालय : पंचाळे बुद्रुक, पांचाळे खुर्द, मेनुंबरवाडी आसाणे, माळीण, आमडे, बोरघर, अडिवरे, आहुपे, पिंपरगणे, कोंढरे, दिगद, नाव्हेड, डोण, तिरपाड, नानवडे.

संपर्क साधा

काही अडचण आल्यास मारुती लोहकरे मोबाईल क्रमांक ९४२३२४३२९५ किंवा निवृत्ती गवारी ८८८८२५९११६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT