Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Inputs : बुलडाण्यात रुजतेय बांधावर जैविक निविष्ठानिर्मिती तंत्र

Organic Farming : सकस अन्न निर्मिती, शेतीमाल उत्पादनावरील खर्चात कपात, पर्यावरणाचे संरक्षण अशा विविध बाबींसाठी पोषक असलेल्या जैविक निविष्ठांची निर्मिती आता शेतकरीच करू लागले आहेत.

Team Agrowon

Buldana News : सकस अन्न निर्मिती, शेतीमाल उत्पादनावरील खर्चात कपात, पर्यावरणाचे संरक्षण अशा विविध बाबींसाठी पोषक असलेल्या जैविक निविष्ठांची निर्मिती आता शेतकरीच करू लागले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सात जैविक निविष्ठा निर्मिती प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत.

सन २०२३-२४ मध्ये जिल्ह्यामध्ये एकूण सात बांधांवरील जैविक प्रयोगशाळा उभारणीसाठी निवड करण्यात आली. त्यांना प्रशिक्षणासाठी वाशीम जिल्ह्यातील येरंडा (ता. मालेगाव) फार्म लॅब येथे दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यान तेथे डॉ. संतोष चव्हाण यांनी ट्रायकोडर्मा ग्रॅन्युअल खत, कडधान्याची स्लरी, निमजल आणि बऱ्याच जैविक औषधींची माहिती दिली.

प्रशिक्षण झाल्यानंतर जैविक लॅब निर्मितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी पूर्वसंमती देऊन दिली. त्यानंतर या फॉर्म लॅब कार्यान्वित करून घेण्यात आल्या. शेतकरी गटांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर प्रत्येक प्रयोगशाळेला एक लाख रुपये अनुदान मंजूर झाले.

अनुदान मंजूर झाल्यानंतर त्यातून साहित्य खरेदी करण्यात आली. आता त्याद्वारे शेतकरी विविध प्रकारच्या जैविक निविष्ठा तयार करून शेतीत वापरू लागले आहेत. बांधावर जैविक निविष्ठा निर्मितीचा उद्देश कमी खर्चात निविष्ठा उपलब्ध करून देणे हा आहे. शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न घ्यावयाचे झाले तर कृषी निविष्ठा ही बाब अत्यंत महत्त्वाची असते. यामध्ये विविध कीटकनाशके/बुरशीनाशके, खतांचा समावेश होतो.

जिल्ह्यात यांनी सुरू केले काम

श्री शिवाय शेतकरी गट चांडोळ (ता. जि. बुलडाणा), दत्तात्रेय सेंद्रिय गट (सावरखेड, ता. चिखली), माउली सेंद्रिय शेतकरी गट (वाघूळ, ता. मलकापूर), दुर्गाशक्ती स्वयंसाह्यता बचत गट (शिर्ला नेमाने, ता. खामगाव), बालगोविंद स्वयंसाह्यता शेतकरी गट (सुनगाव, ता. जळगाव जामोद) आणि सूर्योदय शेतकरी गट (जवळखेड, ता. देऊळगावराजा) अशा प्रकारे सात गटांनी या जैविक निविष्ठा निर्मितीचे प्रशिक्षण घेत काम सुरू केले आहे. या गटाला प्रत्येकी एक लाखाचे अनुदान देण्यात आले.

माझ्याजवळ चार एकर शेती आहे. मी पूर्वीपासून रासायनिक शेती करायचो. रसायनामुळे शेतीची हानी व्हायची. सतत रासायनिक शेती परवडत नव्हती. आत्मा संचालक कार्यालयातून फार्म लॅबबद्दल माहिती मिळाली. डिसेंबर २०२३ मध्ये राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन व कापूस पिकांची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेअंतर्गत आमच्या गटाची बांधावर जैविक निविष्ठा निर्मिती फॉर्म लॅबसाठी निवड करण्यात आली. योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी १०० हेक्टरच्या मर्यादेत समूह/गट तयार करण्यात आले. माझ्या शेतातील खर्च कमी झाला. आमच्या लॅबसोबत आतापर्यंत एकूण १०५ शेतकरी जुळलेले आहेत.
- किरण प्रतापसिंग चव्हाण, शिर्ला नेमाने, ता. खामगाव, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT