Organic Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Farming : लोहा तालुक्यात होणार सेंद्रिय शेतीचे क्लस्टर

Chemical Fertilizers : राज्यातील शेतीक्षेत्रात रासायनिक खतांचा असंतुलित वापर, कीटकनाशकांचा अतिप्रमाणात आणि अनावश्यक वापर रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात येत आहे.

Team Agrowon

Nanded News : ‘‘कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’च्या माध्यमातून परंपरागत कृषी विकास सेंद्रिय शेती योजना राबविली जाते. आता ही योजना नांदेडमधील लोहा तालुक्यात व्यापक पद्धतीने राबविली जाईल,’’ अशी माहिती ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अनिल गवळी यांनी दिली.

राज्यातील शेतीक्षेत्रात रासायनिक खतांचा असंतुलित वापर, कीटकनाशकांचा अतिप्रमाणात आणि अनावश्यक वापर रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात येत आहे. यासाठी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्याची निवड करण्यात आली आहे. यात सेंद्रिय शेती-विषमुक्त शेतीसाठी चालना देण्यात येईल.

शेतीमध्ये रासायनिक खतांचा असंतुलित वापर वाढल्याने जमिनीतील जैविक घटकांचा विनाश होऊन त्या मृतवत होत चालल्या आहेत. तसेच तणनाशके-कीटकनाशकांच्या अतिवापरामुळेही जमिनीची सुपीकता कमी झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांचा जैविक शेतीतून उत्पादित होणाऱ्या उत्पादनांकडे वाढता कल आहे.

परदेशातूनही अशाच फळपिकांना मागणी आहे. त्यातून सेंद्रिय (जैविक) शेतीची गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे. या योजनेत लोहा तालुक्यात सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची उत्पादक कंपनीदेखील नोंदणी करण्यात येईल.

...अशी आहे योजना

‘‘एकाच गावात कमीत कमी २० शेतकऱ्यांचा ५० हेक्टरचा एक गट करावा लागेल. तालुक्यात २५ गटांची नोंदणी करावी लागेल. त्यासाठी एक गट प्रवर्तक, गट मार्गदर्शक व तज्ज्ञ प्रशिक्षकांची निवड केली जाईल.

एका शेतकऱ्यांना कमाल दोन हेक्टरपर्यंत लाभ दिला जाईल. सहभागी सर्व शेतकऱ्यांना लागवड ते काढणीपर्यंत किमान पाच प्रशिक्षणे दिली जातील. निविष्ठा तयार करण्याबाबत प्रशिक्षण दिले जाईल. शेतीमालाचे ब्रँडिंग केले जाईल.

डीबीटी पद्धतीने अनुदानही दिले जाईल. या योजनेत सहभागी होण्यासाठी तालुका कृषी अधिकारी, ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापकांशी संपर्क साधावा’’, अशी माहिती ‘आत्मा’च्या प्रकल्प उपसंचालक माधुरी सोनवणे यांनी दिली.

योजनेची उद्दिष्टे...

- सेंद्रिय शेतीच्या प्रसारासोबतच त्यातील शेतीमालाच्या वितरणासाठी व्यवस्था निर्माण करणे

- सेंद्रिय शेतीसाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे

- पिकांचे अवशेष वापरून शेतातच सेंद्रिय शेती निविष्ठा तयार करण्याची प्रणाली विकसित करणे

- राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार सेंद्रिय निविष्ठा योग्य पद्धतीने वापरण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे

- सेंद्रिय शेतीमालाच्या वितरणासाठी बाजारपेठ आणि स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करणे

- सेंद्रिय शेतीमालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे

- सहभाग हमी पद्धतीने सेंद्रिय शेतीचे गट प्रमाणीकरण करून घेणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT