Organic Curb Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Curb : सेंद्रिय कर्ब : जमिनीच्या सुपीकतेतील महत्त्वाचा घटक

Article by Dr. Pratiksha Pawar, Chaitali Wagh, Nayan Gosavi : या लेखातून आपण सेंद्रिय कर्ब, त्याचे जमिनीला होणारे फायदे आणि जमिनीत त्याची वाढ करण्याचे उपाय यांची थोडक्यात माहिती घेऊ.

Team Agrowon

डॉ. प्रतीक्षा पवार, चैताली वाघ, नयन गोसावी

Organic Compost, its Benefits to Soil and Measures to Increase it in Soil :

सेंद्रिय कर्ब म्हणजे काय?

पृथ्वीतलावर आणि भूगर्भात सर्वांत जास्त आणि मुबलक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य म्हणजे कार्बन. या कर्बाचे विविध प्रकार असून, जैविक आणि वनस्पतिजन्य कार्बनी घटकांपासून तयार होणाऱ्या कर्बाला सेंद्रिय कर्ब (organic carbon) म्हणून ओळखले जाते.

कृषिक्षेत्रात पिकांच्या वाढीमध्ये सर्वाधिक सहभाग याच मातीतील सेंद्रिय कर्बाचा असतो. सेंद्रिय कर्बाचे मुबलक प्रमाण असलेल्या जमिनीतून पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ती सर्व मूलद्रव्यांची उपलब्धता वाढते. कारण अशा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बावर उदरनिर्वाह करणाऱ्या सूक्ष्मजीवांचे प्रमाण अधिक असते.

सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव कार्यरत होऊन माती जिवंत होण्यास मदत होते. हे सूक्ष्मजीव वनस्पतींना शोषता येईल, अशा स्वरूपामध्ये मूलद्रव्यांचे रूपांतर करत असतात. मुळांच्या अवतीभोवती असणाऱ्या मातीच्या स्तरात (रायझोस्फिअर) कार्यरत सूक्ष्मजीवांच्या वेगवेगळ्या कृतींद्वारे पुरवला जातो.

आपण जमिनीच्या मशागतीनंतर चांगली कुजलेली सेंद्रिय खते (उदा. शेणखत, गांडूळ खत इ.) मिसळत असतो. त्यामध्ये कर्बाचे प्रमाण जवळपास ६० टक्क्यांपर्यंत असते. जमिनीची सुपीकता ही सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणानुसार ठरवली जाते.

उदा. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी असते, अशा जमिनीतून शेतीचे उत्पादन कमी मिळते. अशी जमीन शेतीसाठी अयोग्य किंवा कमी उत्पादक मानली जाते. तर ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब चार टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असतो, तेव्हा तिला सुपीक जमीन असे म्हणतात. ज्या मातीमध्ये १२ ते १८ टक्के श्रेणीत सेंद्रिय कर्ब असतो, अशा मातीस ‘सेंद्रिय माती’ असे संबोधतात.

कोणत्याही मातीच्या भौतिक गुणधर्म, कणांची रचना, घनता यासाठी सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच प्रमाणे जमिनीमध्ये कार्बन आणि नत्र यांचे योग्य गुणोत्तर प्रमाण राखले गेल्यास पिकाच्या वाढीला चांगला फायदा होतो.

जमिनीत सेंद्रिय कर्ब कुठे असतो?

सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या वरील थरात असलेल्या जिवाणूंच्या माध्यमातून कार्यरत राहतो. त्यामुळेच मातीचा वरील थर हा सर्वाधिक सुपीक मानला जातो. तो जपण्यासाठी शेतकऱ्यांनी सातत्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता असते.

जमिनीतील सेंद्रिय कर्ब प्रमाणानुसार जमिनीच्या सुपीकतेचे निकष –

०.२ टक्क्यापेक्षा कमी ————–> अत्यंत कमी

०.२१ ते ०.४० टक्के या दरम्यान —> कमी

०.४१ ते ०.६० टक्के —————–> मध्यम

०.६० ते ०.८० टक्क्यांपर्यंत ———-> जास्त

०.८० पेक्षा अधिक ——————–> खूप जास्त

सेंद्रिय कर्बाचे मुख्य फायदे –

अ) पोषकद्रव्यांची उपलब्धता –

जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब अधिक असल्यास त्यामुळे जमिनीतील ९० ते ९५ टक्के नायट्रोजन, १५ ते ८० टक्के फॉस्फरस, आणि २० ते ५० टक्के सल्फरचे स्थिरीकरण होण्यास मदत होते.

जमिनीच्या अनेक भागात खनिज द्रव्याची स्थिरता आणि मातीतील संपूर्ण धनभारित विद्युतीकरणाची वाहन क्षमता वाढते.

जमिनीमध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि इतर सर्व मूलद्रव्याचे स्थिरीकरण करते.

पोषकद्रव्यांची धारण क्षमता वाढवते. सर्वांना एकत्रित धरून ठेवते.

ब) माती संरचना सुधारते

जमिनीच्या भौतिक गुणधर्मात सुधारणा होते.

मातीमध्ये हवा आणि पाणी पोकळी निर्माण करून चांगल्या माती संरचनेला साह्य करते.

३जमिनीच्या सुपीक स्तरांची बांधणी करण्यास साह्य करते. त्यामुळे मातीची धूप कमी होते. मातीची जडण घडण सुधारते.

जमिनीमध्ये जिवाणूंसह विविध सजीवांच्या वाढीस प्रोत्साहन देते. (उदा : गांडूळ, भुंगेरे इ.)

क) वनस्पती वाढीस थेट मदत

जमिनीतील सूक्ष्मजीवांमार्फत नत्राचे स्थिरीकरण करून नायट्रेट आणि अमोनिया आम्ल हवेत सोडला जातो.

जमिनीतील पोकळीमधील हवेत कार्बन डायऑक्साइडची वाढ होते. त्यामुळे वनस्पतींची वाढ होण्यास प्रोत्साहन मिळते.

सेंद्रिय कर्बामुळे जमिनीमध्ये हवेची पोकळी निर्माण होते. त्यामुळे मुळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते.

ड) जमिनीत पाणी संबंध सुधारते

खुल्या संरचनेमुळे जमिनीत पावसाचे पाणी शोषण्याची व निचऱ्याची क्षमता वाढते. उदा. हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. भारी काळ्या जमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होतो.

पाण्याचा अपव्यय कमी होतो.

ह्युमसमधील सूक्ष्म कणांचे पाण्यामध्ये विघटन होते. जमीन बांधणीस प्रोत्साहन मिळते.

सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये संग्रहित होत राहतो. तो हळूहळू पुढील पिकांना वाढीच्या अवस्थेत उपलब्ध होत राहतो.

इ) अन्य फायदे

जमिनीमधील नत्र आणि स्फुरदाच्या उपलब्धता वाढते. विशेषतः स्फुरद स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते आणि स्फुरदाची उपलब्धता वाढते.

जमिनीचा सामू उदासीन (६.५ ते ७.५) ठेवण्यास मदत होते.

----------९.--------------- चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्यांची स्थिरता कमी होते.

यामुळे एकूण वापरलेल्या बहुतांश सर्व रासायनिक खतांची घटकांचा ऱ्हास टळतो. उदा. नत्र इ.

जमिनीतील सेंद्रिय कर्ब कसा वाढवता येईल?

पिकांची नियमित फेरपालट करून, त्यात पीक पद्धतीमध्ये किंवा आंतरपीक म्हणून कडधान्य पिकांचा समावेश करणे.

शिफारशीप्रमाणे दरवर्षी सेंद्रिय खत शेवटच्या कुळवाच्या पाळीआधी जमिनीत मिसळावे.

क्षारपड जमिनीत धैंचा किंवा ताग अशा हिरवळीची खतपिके जमिनीत पेरून फुलोऱ्यावर येण्यापूर्वी जमिनीत गाडावीत. उसासारख्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून ताग पेरून गाडावा.

उभ्या पिकात निंबोळी पेंडीचा वापर करावा.

पीक अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करावा. उदा. खोडवा उसाचे पाचटाचे नियोजन करावे.

शेतीची पशुसंगोपनातून उपलब्ध होणाऱ्या शेण, कोंबडखत, शेळीच्या लेंड्या यांचा भरपूर प्रमाणात वापर करावा.

चैताली वाघ, ७६२०९९४६९३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT