Devsthan Lands Agrowon
ॲग्रो विशेष

Devsthan Lands : 'त्या' जमिनींचा लिलाव प्रक्रिया करण्याचे आदेश

Devsthan Lands Maharashtra : त्यातील ज्या शेतकऱ्यांनी कबुलायत (खंड भरणे) केलेली नाही, त्या जमिनींचा लिलाव प्रक्रिया करण्याचे आदेश समितीच्या सचिवांनी दिले आहेत.

sandeep Shirguppe

West Maharashtra Devasthan Committee : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारित कोल्हापूर, सांगली व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तीस हजार एकरहून अधिक जमिनी आहेत. त्यातील ज्या शेतकऱ्यांनी कबुलायत (खंड भरणे) केलेली नाही, त्या जमिनींचा लिलाव प्रक्रिया करण्याचे आदेश समितीच्या सचिवांनी दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला आमदार प्रकाश आबिटकरांनी सूचना केल्या.

यावेळी आमदार आबिटकर म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारितील शेतकऱ्यांच्या कबुलायत (खंड भरणे) व वारसांच्या नोंदी वेळेत कराव्यात. देवस्थान समितीच्या अखत्यारीत जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्याची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री केली आहे.

त्यासाठी पाठपुरावा सुरु असून, शासनस्तरावर कायदा करण्याची कार्यवाही सुरु आहे. विधि व न्याय विभागाचा अभिप्राय घेवून पुढील कार्यवाही सुरू झाली असल्याची माहिती आमदार आबिटकर यांनी दिली.

ही बैठक देवस्थान समितीच्या अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असेही आमदार आबिटकर यांनी सांगितले.

बैठकीला समितीच्या प्रशासकीय अधिकारी शितल इंगवले, अरुणराव जाधव, विजय बलुगडे, विश्वास राऊत, भगवान पाटील, सुभाष पाटील, महेश देसाई, प्रा. वसंतराव चांदूरकर आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

Akola Heavy Rainfall: अकोला जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सून पावसाची दमदार हजेरी

Seed Ball Making: सीड बॉल निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Marathwada Rain 2026: छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ९ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT