Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : विमा कंपनीचे कार्यालय बंद; फौजदारी गुन्हे दाखल करा

Crop Insurance Scheme : त्या पार्श्‍वभूमीवर विमा कंपनीने कार्यालय न उघडल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला दिले आहेत.

Team Agrowon

Yavatmal News : तुटपुंजी भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या कारणावरून पीकविमा कंपनीविरोधात रोष आहे. अशातच कंपनीकडून चक्‍क आपले कार्यालयच बंद करण्यात आल्याने या संतापात भर पडली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विमा कंपनीने कार्यालय न उघडल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला दिले आहेत.

संततधार पाऊस, अतिवृष्टी या कारणांमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्याची दखल घेत दिवाळीपूर्वी विमा कंपनीने ५९ हजार शेतकऱ्यांना ४१ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन रुपयांपासून ४४ रुपयांपर्यंतची रक्‍कम जमा करण्यात आली. या विरोधात शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आलेल्या विमा कंपनीच्या प्रमुखाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांच्यासमोरच मारहाण करण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी पोलिस तक्रार झाली. त्यामध्ये मारहाणीसोबतच जबरीने पैसे हिसकल्याचा आरोप करण्यात आला. त्यावरून जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.

या घडामोडीनंतर विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यासोबतच तालुकास्तरावरील कार्यालयांना टाळे लावले आहे. शेतकऱ्यांनी मोबाइलवरून संपर्क केला असता त्यांना सरळ उत्तर दिले जात नाही. विमा कर्मचाऱ्यांच्या बेताल संभाषणाचे रेकॉर्डिंग करून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ऐकविले.

त्यांनी देखील या प्रकरणात संताप व्यक्‍त केला आहे. विमा कंपनीकडून नियमित कार्यालय न सुरू ठेवल्यास त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला दिले आहेत.

त्या तक्रारीही वाऱ्यावर

सर्व्हेक्षणात जास्त नुकसान दाखविण्यासाठी विमा प्रतिनिधींकडून पैसे मागितल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. सामूहिक सेवा केंद्र (सीएससी)धारकांकडे या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. या तक्रारी घेऊन ते विमा कार्यालयात गेले. परंतु कार्यालयच कुलूप बंद असल्याने त्या स्वीकारण्यात आल्याच नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT