Agriculture Drone Agrowon
ॲग्रो विशेष

Drone Subsidy : ड्रोन अनुदानातील ऑफलाइन पद्धत बंद करण्याचे आदेश

Agriculture Subsidy Update : राज्यातील शेतीकामासाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रोनसाठी अनुदान वाटताना सध्याची ऑफलाइन पद्धत तत्काळ बंद करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले आहेत.

मनोज कापडे

Pune News : राज्यातील शेतीकामासाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रोनसाठी अनुदान वाटताना सध्याची ऑफलाइन पद्धत तत्काळ बंद करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे यंदा ड्रोनची योजना महाडीबीटी संकेतस्थळावर उपलब्ध होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानात २०२२-२३ पासून ड्रोनसाठी अनुदान देण्यास सुरुवात झाली होती.

त्यामुळे राज्यात किसान ड्रोन अर्थसाह्य सेवा व सुविधा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय राज्याने घेतला. यामुळे २५ ठिकाणी ड्रोन सुविधा केंद्रांना; तर १३ भागांमध्ये कृषी पदवीधरांना ड्रोनसाठी अनुदान दिले जाणार होते. परंतु, लालफितीमुळे ही योजना एका वर्षात पूर्ण झाली नाही. याशिवाय कामकाजदेखील ऑफलाइन पद्धतीने करण्यात आले होते.

पहिल्याच टप्प्यात ३८ ड्रोनसाठी जवळपास पावणे दोन कोटी रुपयांचे अनुदान वाटप करणे अपेक्षित होते. परंतु, २०२२ मध्ये केवळ ८, २०२३ मध्ये १७ आणि उर्वरित १३ ड्रोनसाठी चालू वर्षात अनुदान वाटण्यात आले. २०२४-२५ या नव्या वर्षात राज्यात १०० ड्रोनसाठी अंदाजे चार कोटी अनुदानाचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

मात्र, या योजनेचे कामकाज अद्यापही ऑफलाइन पद्धतीनेच केले जात होते. आयुक्तांनी ही पद्धत बंद करुन महाडीबीटी पोर्टलवर योजना नेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर यांनी राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना (एसएओ) ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अनुदान दिलेल्या ड्रोनची उपयुक्तता किती?

ड्रोनआधारित शेती ही संकल्पना चांगली असली तरी ती गावपातळीवर अद्याप रुजलेली नाही. त्यामुळे पावणे दोन कोटी रुपयांचे अनुदान वाटूनदेखील ड्रोनचा हवा तसा वापर झाला नाही. ड्रोनची उपयुक्तता वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठ व कृषी विभागाला एकत्रित कार्यक्रम व प्रात्यक्षिके घ्यावी लागतील, असे मत एका कृषी अधिकाऱ्याने व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gulabrao Patil: शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, पण उद्योजकांना व्हायला नको, गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, शेतकरी नेत्यानं चांगलंच सुनावलं

Farmer Loan Waive : कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार?

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील १४३ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस

Poor Seed Germination: ‘महाबीज’च्या सोयाबीनची उगवणच नाही

Loan Waiver Eligible List: नांदेड जिल्ह्यात कर्जमाफीच्या ९६ हजार पात्र यादी प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT