Pune APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC : पुणे बाजार समितीच्या गैरव्यवहारांच्या फेरचौकशीचे आदेश

Pune APMC Inquiry : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने २० वर्षांपूर्वी केलेल्या गैरव्यवहारांसह नंतरच्या कामकाजाच्या चौकशीसाठी पणन संचालकांनी चौकशी समिती स्थापन केली आहे.

गणेश कोरे

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने २० वर्षांपूर्वी केलेल्या गैरव्यवहारांसह नंतरच्या कामकाजाच्या चौकशीसाठी पणन संचालकांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. यामुळे गेल्या २० वर्षांनंतर नियुक्त झालेल्या संचालक मंडळाला पाच महिन्यांतच पुन्हा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

यामध्ये गेल्या सुमारे साडेचार वर्षांच्या कालावधीतील व्यवहारांची चौकशी होणार असून, यामध्ये दोन प्रशासकांच्या व्यवहारांचीही चौकशी होणार आहे. बाजार समितीच्या गैरकारभाराबाबत तत्कालीन संचालकांवर जबाबदारी निश्चितीची नोटीस पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी वैध ठरविली.

त्यानंतर पणन संचालक डॉ. केदारी जाधव यांनी हा आदेश जारी केला. चौकशीसाठी आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. पंधरा दिवसांच्या आत अहवाल द्यावा असा आदेश काढण्यात आला.

एक एप्रिल २०१९ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीतील व्यवहारांची बाजार समिती कायद्यातील कलम ४० (अ) नुसार तपासणी होईल. यात विद्यमान संचालक मंडळाच्या पाच महिन्यांच्या कालावधीचा समावेश आहे. चौकशीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून पणन सहसंचालक दीपक शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सहसंचालक राजेंद्रकुमार दराडे, सहकारी संस्था राज्यस्तरीय लेखा समिती सहनिबंधक कुबेर शिंदे, पणन उपसंचालक अविनाश देशमुख, उपसंचालक रवींद्र गोसावी, लेखापरीक्षक डी. एच. डोके, सहायक निबंधक बाळासाहेब तावरे, पणन संचालनालय कार्यालय अधीक्षक अभयकुमार बर्डे यांचा समितीत समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT