Horticulture Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Bhausaheb Fundkar Scheme: भाऊसाहेब फुंडकर योजनेत २८९ हेक्टरवर फळबाग लागवड

Farmers Support: भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षात २८९.५५ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट साध्य झाले आहे.

Team Agrowon

Hingoli News: भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षात २८९.५५ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. २०२५-२६ या वर्षात योजनेत ६०० हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली.

कृषी विभागामार्फत राबविल्या जात असलेल्या राज्य शासनाच्या या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना बहुवार्षिक फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देणे तसेच त्यासाठी त्यांना आवश्यक आर्थिक साह्य उपलब्ध करून देणे हा आहे. योजनेअंतर्गत आंबा, पेरू, संत्रा, डाळिंब, काजू, नारळ, सीताफळ, आवळा, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, चिकू, कागदी लिंबू, मोसंबी, चिंच या १६ प्रकारच्या फळपिकांची लागवड करता येते.

शेतकऱ्यांच्या नावावर सात-बारा असणे आवश्यक आहे. सात-बारा संयुक्त खातेदारांच्या नावावर असेल तर सर्व खातेदारांचे संमतीपत्र अनिवार्य आहे. सात-बारांवर कुळाचे नाव असल्यास त्यांच्या संमतीसह अर्ज करता येतो. संस्थात्मक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी या योजनेस पात्र ठरत नाहीत.

‘महाडीबीटी’च्या https://mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी. त्यानंतर कृषी विभाग या पर्यायांतर्गत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना निवडावी. आवश्यक कागदपत्रांमध्ये सात-बारा उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, संमतीपत्र यांचा समावेश असतो. ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून पोर्टलवर अपलोड करावीत.

नंतर अर्ज पूर्ण भरून ऑनलाइन सादर करावा. त्याची प्रिंट घ्यावी. अर्ज मंजूर झाल्यानंतर लागवड करून शासकीय अनुदानासाठी अंतिम प्रस्ताव सादर करावा. या वर्षापासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.

मागील वर्षी याअंतर्गत लागवड झालेल्या प्रमुख फळपिकांमध्ये संत्रा ६५.९ हेक्टर, पेरू ३२.१०, सीताफळ २४.७३ हेक्टर या पिकांचा समावेश आहे.जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करून फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT