Orange Market Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Market : संत्रा विक्रीला आला वेग

Orange Rate : जिल्ह्यात संत्रा बागांमध्ये फळ तोडणीने वेग घेतला असून यासाठी विविध भागांतील व्यापारी, मजूर दाखल झालेले असून, दररोज मोठ्या प्रमाणात संत्रा फळे बाहेर नेली जाऊ लागली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Washim News : जिल्ह्यात संत्रा बागांमध्ये फळ तोडणीने वेग घेतला असून यासाठी विविध भागांतील व्यापारी, मजूर दाखल झालेले असून, दररोज मोठ्या प्रमाणात संत्रा फळे बाहेर नेली जाऊ लागली आहे. सध्या संत्र्याची ४५००० ते ५०००० रुपयांदरम्यान टनाने मागणी केली जात आहे. यावर्षी बहुतांश बागांचे सौदे आधीच क्रेटप्रमाणे झालेले असल्याने अनेकांना सध्याच्या वाढलेल्या दरामुळे आर्थिक फटकासुद्धा बसला आहे.

यावर्षात संत्र्याला मोठी मागणी तयार झाली आहे. जिल्ह्यात संत्र्याचे क्षेत्र ११ हजार हेक्टरपर्यंत पोहोचले असून, अर्ध्या अधिक क्षेत्रावरील बागांमधून फळ निघण्यास सुरुवात झालेली आहे. यावर्षात संत्रा बागांचे सौदे फुलोर, फळे लहान असतानाच झाले होते.

बऱ्याच उत्पादकांनी मागील काही वर्षांतील कटू अनुभव लक्षात घेत यंदा ७०० ते ७५० रुपये प्रतिक्रेट प्रमाणे बागांची आधीच विक्री करून ठेवली होती. दरम्यान आता फळ तोडणीला सुरुवात झाली असून बाजारात मागणी पाहता व्यापाऱ्यांकडून ४५००० ते ५०००० दरम्यान प्रतिटनाने खरेदी केली जात आहे.

ज्यांनी सुरुवातीला सौदे केलेले नव्हते अशा शेतकऱ्यांना सध्याचा वाढीव दर मिळू लागला आहे. या वर्षी जिल्ह्यात बागांमध्ये चांगल्या प्रमाणात फळधारणा झाली होती. त्यामुळे मागील तीन-चार वर्षांत झालेले नुकसान यावर्षीच्या दरांनी व मालामुळे बऱ्यापैकी भरून निघेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

समृद्धी ठरतोय फायदेशीर

वाशीम जिल्ह्यातील संत्रा दूरच्या बाजारपेठांमध्ये नेण्यासाठी समृद्धी महामार्ग फायदेशीर बनला आहे. या जिल्ह्यातून हा महामार्ग गेला असून दोन ठिकाणी प्रवेशद्वार आहेत. मंगरूळपीर तालुक्यात वनोजा भागात संत्रा हब असून याच ठिकाणी समृद्धीवर प्रवेश मिळतो. त्या ठिकाणावरून व्यापारी समृद्धीद्वारे माल नेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sericulture Technology : रेशीम उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे

Property Sale and Purchase Deals: खरेदी-विक्री व्यवहारांसाठी ‘आधार’ प्रमाणीकरण बंधनकारक

Data Hub Development: महाराष्ट्र ‘आशियातील सर्वांत मोठे डेटा हब’ बनेल: विधानसभा अध्यक्ष नार्वेकर

Moringa Processing Unit Inaugurated: आदिवासी शेतकऱ्यांना मूल्यवर्धनातून आर्थिक स्थैर्याचा मार्ग; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते उद्‌घाटन

Bembla Dam Discharge Issue: बेंबळा विसर्गाच्या नुकसानीचा अहवाल शेतकऱ्यांनी जाळला; शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

SCROLL FOR NEXT