Orange Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Harvesting : वाशीमला संत्र्याच्या मृग बहर तोडणीस प्रारंभ

Orange Rate : दर्जेदार संत्रा उत्पादनात विदर्भात आघाडीवर येत असलेल्या वाशीम जिल्ह्यात यंदाच्या मृग बहराची तोडणी सुरू झाली आहे.

Team Agrowon

Washim News : दर्जेदार संत्रा उत्पादनात विदर्भात आघाडीवर येत असलेल्या वाशीम जिल्ह्यात यंदाच्या मृग बहराची तोडणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना प्रतिटन ३५ ते ४२ हजारांदरम्यान दर भेटत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

या जिल्ह्यात संत्र्याचे १२ हजार हेक्टरपर्यंत लागवड क्षेत्र पोहोचले आहे. मृग बहर घेण्यासाठी शेतकऱ्यांनी यंदा केलेले नियोजन बऱ्याच अंशी फळाला आले आहे. अनेक बागा चांगल्या पद्धतीने बहरल्या होत्या. या फळांची तोडणी सध्या सुरू झाली.

बुधवारी (ता.१६) रिसोड तालुक्यातील वडजी गावात महेंद्र बोरकर यांची पहिल्यांदा बाग तोडणी सुरू झाली. या वेळी करडा कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विभाग प्रमुख निवृत्ती पाटील, शेतकरी महेंद्र बोरकर, राजेश बोरकर, विलासराव बोरकर, आर. के. बोरकर, गजानन बोरकर, दीपक ईडोळे, संत्रा खरेदीदार शेख शब्बीर शेख कदीर उपस्थित होते.

या वर्षी संत्र्याला बाजारपेठे चांगली मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना प्रति टन ३५ ते ४२ हजारादरम्यान दर मिळतो आहे. अनेक शेतकऱ्यांनी आधीच क्रेटच्या दरानुसार बागांची विक्री केलेली आहे. यंदा दर व बहर चांगला असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

वाशीम जिल्ह्यात संत्रा उत्पादन व क्षेत्र वाढीसाठी करडा कृषी विज्ञान केंद्राचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात क्षेत्र वाढले. खासकरून मृग बहर व्यवस्थापनासाठी दरमहा शिवारफेरी तसेच वेळोवेळी या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यात आले.

फळ काढणीचा पहिला हंगाम बाजारपेठेच्या दृष्टीने अधिक यशस्वी होण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. केव्हीके वडजी हे गाव दत्तक घेतलेले असून तेथूनच संत्रा फळ काढणीला प्रारंभ झाला आहे.

करडा कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने जिल्ह्यात दर्जेदार संत्रा उत्पादनासाठी तंत्रज्ञान विस्ताराचे काम सातत्याने सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील क्षेत्र १२ हजार हेक्टरवर पोहोचले आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्कात राहून कमी खर्चातील तंत्रज्ञान आत्मसात करावे व उत्पन्नात वाढ करावी.
- डॉ. रवींद्र काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, करडा, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT